Nandurbar News : ...अखेर ॲप्रोच रस्त्यावर गतिरोधक

Shahada: Blocking the approach road at Mohida Chauphuli near the city on the Kolda-Khetia road
Shahada: Blocking the approach road at Mohida Chauphuli near the city on the Kolda-Khetia roadesakal
Updated on

शहादा : शहराला लागून जाणाऱ्या कोळदा-खेतिया मार्गावरील शहरातील मोहिदा चौफुलीवरील ॲप्रोच रस्त्यावर आमदार राजेश पाडवी यांच्या सूचनेनुसार अखेर गतिरोधक टाकल्याने काही अंशी अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.

शहराला लागून जाणाऱ्या कोळदा ते खेतिया या राष्ट्रीय महामार्गावर मोहिदा चाररस्ता चौफुलीवर तसेच इतर अपघातप्रवण क्षेत्रात अनेक अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. (MLA Padvi Instruction Measures to prevent accidents deadlocked on approach road Jalgaon News)

Shahada: Blocking the approach road at Mohida Chauphuli near the city on the Kolda-Khetia road
Jalgaon News : महापालिका करणार सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण; वैयक्तिक शौचालय अनुदान

नागरिकांच्या रोष, तक्रारी व सातत्याने मागणी बघता वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने मोहिदा चौफुलीवरील ॲप्रोच रस्त्यावर गतिरोधक बनविण्यात आले.

गतिरोधक बनवीत असताना भाजपचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाळे, आमदारांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मोहिदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच शहादा शहरात जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने गतिरोधक बनविण्यात आले, ज्याच्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा येऊन तेथील अपघात होण्याची शक्यता आता कमी होईल.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Shahada: Blocking the approach road at Mohida Chauphuli near the city on the Kolda-Khetia road
Nashik News : ABB मध्ये 24 हजाराची पगारवाढ! मकर संक्रांतीची गोड भेट

सातत्याने या रस्त्यावर मोहिदा चौफुली व डोंगरगाव चाररस्ता या भागात अपघातांची मालिका सुरूच होती. अपघात कमी करण्यासाठी शहरातील जागरूक नागरिक, विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी आमदारांसह अनेक ठिकाणी उपाययोजनेसंबंधी मागणी केली होती. रस्त्याच्या उपाययोजनेबाबत संबंधित ठेकेदाराने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. अनेक कामे अपूर्ण असल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त झालेले आहेत. जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. इतरही अपघात प्रवणक्षेत्रात गतिरोधक टाकण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

"डोंगरगाव चाररस्ता काँक्रिटचा असल्याने नवीन तंत्रज्ञानाचे प्लॅस्टिकचे गतिरोधक लावले जाणार आहेत."

-हेमराज पवार, आमदारांचे स्वीय सहाय्यक

Shahada: Blocking the approach road at Mohida Chauphuli near the city on the Kolda-Khetia road
Jalgaon News : पाचोरा-जामनेरदरम्यान ‘नॅरो’चे रूपांतर होणार Broad Gaugeमध्ये! 50 किलोमीटरचा फेरा वाचणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com