जात पडताळणीप्रश्नी आमदार शाह यांचे निवेदन 

MLA Shah demands for caste validity
MLA Shah demands for caste validity

धुळेःछप्परबंद, शाह, फकीर, मुस्लिम मेहतर समाजाच्या जात पडताळणीसाठी येणारे अडथळे दूर करावेत, अशी मागणी आमदार डॉ. फारूक शाह यांनी मुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्र्यांकडे केली.

निवेदनाचा आशय असा

छप्परबंद, शाह, फकीर आणि मेहतर समाज गरीब आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. शासनाने १९७८ ला या समाजाचा विमुक्त जातीत १४ व्या क्रमांकावर समावेश केला. परंतु, शासन निर्णायात छप्परबंद (मुस्लिमधर्मियांसह) असा उल्लेख केला आणि तत्सम शब्द म्हणून शाह, फकीर, छप्परबंद, मेहतर समाज असा उल्लेख केला नाही. त्यामुळे जात पडताळणीत समाजबांधवांना अडचणी निर्माण होतात.

अधिकारी या समाजाकडे छप्परबंद अशा शब्दाची नोंद मागतात. परंतु, छप्परबंद, हा शब्द सांकेतिक व अपमानजनक असून, जातीच्या रकान्यात त्याची नोंद करण्यासाठी नाही. या समाजाच्या पूर्वजांना जातीच्या नोंदीआधारे भविष्यात सवलती मिळतील, याची कल्पना नव्हती. त्यांना कल्पना असती तर त्यांनी कलंकित गुन्हेगारी जातीची नोंद किंवा त्या संदर्भात काही पुरावे जपून ठेवले असते. 

भिक्षा मागणे हा व्यवसाय बनला. जाती जमातीचा फायदा मिळतो ही बाब समजली तेव्हा समाजबांधवांनी अर्ज करणे, धरणे आंदोलनातून आपली ओळख शासनाला करून दिली. तरीही अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे छप्परबंद, शाह, फकीर आणि मुस्लिम मेहतर समाजबांधवांना जात प्रमाणपत्र वैधता करण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे वैधता प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, अशी मागणी असल्याचे आमदार शाह यांनी म्हटले आहे.

या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com