Motivational Story : अवलियाची सायकलवरून जगाची सफर; जर्मनीचा तरुण तळोदा तालुक्यात दाखल

Taloda: Alec traveling the world on a bicycle and the citizens he meets along the way
Taloda: Alec traveling the world on a bicycle and the citizens he meets along the wayesakal

Nandurbar News : दुर्दम्य साहस, इच्छाशक्ती व हिमतीच्या जोरावर जर्मनीचा एक अवलिया सायकलवरून जगाची सफर करण्यासाठी निघाला आहे.

अॅलेक असे त्याचे नाव. जर्मनीतून सुरू झालेला प्रवास २२ देशांतून होऊन सध्या तो भारतात मागील महिनाभरापासून सायकलने प्रवास करीत आहे.

गुजरातमधून महाराष्ट्रात येताना तळोदा-शहादा रस्त्यावर त्याची भेट ‘सकाळ’ प्रतिनिधीशी झाली. त्याच्या या साहसी प्रवासामुळे जीवनात स्वतःच्या आवडीचा रस्ता निवडणाऱ्यांसाठी अॅलेक एक दीपस्तंभच ठरला आहे. (Motivational Story journey around world on bicycle German youth admitted at Taloda taluka Nandurbar News)

Taloda: Alec traveling the world on a bicycle and the citizens he meets along the way
NMC News : उजव्या कालव्यावरील अतिक्रमण हटविणार; पाणीपुरवठा विभागाकडून पत्र

अॅलेक केम्पोन्डेर्फ हे त्याचे नाव. २७ वर्षीय या तरुणाने जगाची सफर सायकलवरून करण्याचा निश्चय केला. त्यासाठी सर्व तयारी करून जर्मनीहून २ फेब्रुवारी २०२२ ला तो प्रवासास निघाला. पोलंडमार्गे लिथुनिया, फिनलँड, रशिया, कझाकस्तान, किरगिजस्तान, तुर्कमेनिस्तान, ओमान, इजिप्त, तुर्कस्तान, सौदी अरेबिया, कुवेत, इराक, इराण, पाकिस्तान व भारत असा त्याचा प्रवास सुरू आहे.

पाकिस्तानातून वाघा बॉर्डरमार्गे अमृतसर येथून तो भारतात आला. भारतातील प्रवासात पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातमधून तो आता महाराष्ट्रात पोचला आहे. महाराष्ट्रातील वेरूळ अजिंठा त्याला पाहावयाचे आहे.

त्यासाठी तो स्टॅच्यू ऑफ युनिटी येथून तळोद्यामार्गे जात असताना तळोदा-शहादा रस्त्यावर त्याची भेट झाली. या भेटीत त्याने आपला चित्तथरारक प्रवास व अनुभव याबद्दल सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Taloda: Alec traveling the world on a bicycle and the citizens he meets along the way
Education News : शाळेत न जाता देता येणार थेट परीक्षा; गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘मुक्त’ शिक्षणाची संधी

भारतातील लोक अत्यंत कष्टाळू व प्रेमळ असून, प्रत्येक ठिकाणी माझी आस्थेवाईकपणे चौकशी करून मला मदत करणारे नागरिक भेटत आहेत.

भारतातील नागरिकांची आपलेपणाची वागणूक मी कायमस्वरूपी लक्षात ठेवणार असल्याचे त्याने सांगितले.

भारतातील मसाल्याच्या अन्नपदार्थांची प्रत्येक ठिकाणी लज्जतदार चव मला चाखायला मिळत आहे. त्यात मला कधी-कधी त्रास होतो तरी येथील नागरिकांचे प्रेम पाहून मी भारावलो असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हे जग माझ्या पद्धतीने पाहण्याची माझी इच्छा असल्याने मी सायकलवरून जगाच्या प्रवासास निघालो असल्याचे त्यांनी सांगितले. अजिंठा, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर करत तो मुंबईला जाणार आहे व तेथून पुन्हा म्यानमार, व्हिएतनाम येथून आपल्या सायकल प्रवासाला सुरवात करणार आहे.

अशा प्रकारे युरोप, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया, त्यानंतर उत्तर व दक्षिण अमेरिकेत तो जाणार आहे. त्याच्या या प्रवासाला ठिकठिकाणी नागरिक त्याला थांबवत त्याचे कौतुक करत त्याच्या प्रवासाला शुभेच्छा देत आहेत.

भारतीय नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. मला ठिकठिकाणी मदत करणारे नागरिक भेटतात. त्यांच्या आपलेपणाने व सहकार्याने मी भारावून गेलो आहे. मला आता महाराष्ट्रात वेरूळच्या लेणी पाहावयाच्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com