Motivational Story : दिवांगत्वावर मात करीत ‘तो’ गाजवतोय रंगमंच; हातगाडी विक्रेता इब्राहिम सागर बनला हास्यकवी

Ibrahim Sagar
Ibrahim Sagaresakal

Dhule News : ‘तू अपंग असल्याने शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊ शकत नाही,’ असे शिक्षकांनी दिव्यांग इब्राहिम सागरला सांगितले.

ती गोष्ट बाल इब्राहिम सागरच्या मनावर कोरली गेली. आपल्या दिवांगत्वावर मात करीत इब्राहिम सागरने देश-विदेशात आपली हास्यकवी म्हणून ओळख निर्माण केली आहे.

इब्राहिम सागर यांना एक मुलगी व दोन मुले आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असलेले सागर दिवांग असूनसुद्धा ते उपजीविकेसाठी धुळे शहरातील तिरंगा चौकात लोटगाडीवर वेफर्स, बेकरी पदार्थांची हात विक्री करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात. (Motivational Story Overcoming disability He playing on stage Handcart seller Ibrahim Sagar turned comedian Dhule News)

इब्राहिम सागर यांचा जन्म मालेगाव येथे झाला. ते पाच वर्षांचे असताना त्यांना ताप आला. तापातच त्यांना पोलिओचे इंजेक्शन देण्यात आले आणि त्यांचे हात आणि पाय गेले.

अशातच त्यांचे प्राथमिक शिक्षण धुळे शहरातील काँग्रेस भवनजवळ असलेल्या अँग्लो ऊर्दू शाळेत दहावीपर्यंत झाले.

ते दिव्यांग असल्याने त्यांना शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येत नसे. ते शल्य त्यांच्या मनात कायम होते; परंतु इच्छा तेथे मार्ग या ब्रीदाप्रमाणेते दहावीनंतर कविता करू लागले आणि पुढे काही काळातच त्यांनी आपली स्वतःची हास्यकवी म्हणून देशपातळीवर ओळख निर्माण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ibrahim Sagar
Nashik Animal News : देवळालीत चोरट्यांकडून जनावरांची चोरी, पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडला प्रकार

इब्राहिम सागर सातासमुद्रापार २०११ मध्ये दुबई येथील इंडियन रिपब्लिक डे मुशायरा ॲन्ड हास्यकवी संमेलनात सहभागी झाले होते.

आतापर्यंत दुबई येथे हास्यकवी संमेलनासाठी तीन ते चार वेळेस जाऊन आले आहेत, तसेच दिल्ली, कोलकता, अहमदाबाद, देवबंद, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणांसह दोनशे कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे.

त्याचबरोबर टीव्ही कलाकार शैलेश लोढा यांच्यासोबत सोनी व सब टीव्हीवर ‘वाह वाह क्या बात है’ या हास्यकवी कार्यक्रमात चार वेळा सहभाग घेतला आहे. दबंग टीव्ही चॅनलवरील ‘बहुत खूब’ हास्यकवी कार्यक्रमात, बेमारू टीव्हीवरील ‘वाह भाई वाह’ या कार्यक्रमातदेखील सहभाग घेऊन धुळे शहराचे नाव देशपातळीवर नेण्याचे काम करीत आहेत.

Ibrahim Sagar
Dhule Crime News : नाशिक, शिरपूरच्या चोरट्यांना 6 दुचाकींसह अटक; शिरपूर शहर पोलिसांच्या शोधपथकाची कारवाई

"दिव्यांगत्वाचे कुठलेही भांडवल न करता स्वाभिमानानेही जगता येते. आपल्यातील सुप्तगुण ओळखून त्यांना जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे. दिव्यांगत्व असले तरी स्वतःला कमी समजू नये."

-इब्राहिम सागर, हास्यकवी

Ibrahim Sagar
Dhule Municipal Corporation : 10 दिवसांत 2 हजार हरकती दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com