पुण्यातील बस चालकाची धुळे आगारात आत्महत्या

चालकाने बेल वाजवण्याच्या दोरीच्या साहाय्याने बसमध्येच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
ST Driver suicide
ST Driver suicideesakal

धुळे : येथील मुख्य मध्यवर्ती बस स्थानकात पुण्यातील एसटी बस डेपोमधील चालकाने बेल वाजवण्याच्या दोरीच्या साहाय्याने बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.६) रात्री साडेदहानंतर घडली. शिवाजी नगर आगार (पुणे) चालक हिरामण नाथा देवरे (वय ५७, रा.नाशिक) असे आत्महत्या करणाऱ्या चालकाचे नाव आहे. (Latest Marathi News)

श्री. देवरे हे शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास धुळे मध्यवर्ती बस स्थानकात पुणे- धुळे बसद्वारे दाखल झाले. नंतर चालक देवरे यांच्यासह कंडक्टरसह जेवण केले. त्यानंतर कंडक्टर येथील बस स्थानकातील विश्रामगृहात झोपण्यासाठी गेला. त्या दरम्यान चालक देवरे यांनी पुणे- धुळे बसमध्येच बेल वाजवण्याच्या दोरीच्या साह्याने गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे स्थानिक अधिकारी व शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी चालक देवरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ST Driver suicide
मला न बोलण्याचे आदेश...कॅमेरे दिसताच कोश्यारींचा काढता पाय
ST Driver suicide
ओबीसींना राजकीय आरक्षण देऊन आम्ही आश्वासन पूर्ण केलं - देवेंद्र फडणवीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com