
Dhule Encroachment Update : अतिक्रमण निर्मूलनासाठी महापालिकेच्या यंत्रणेला पुन्हा जाग
धुळे : शहरातील अतिक्रमण निर्मूलनासाठी महापालिकेच्या यंत्रणेला पुन्हा एकदा जाग आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बारापत्थर चौक, जिल्हा कारागृह, टॉवर गार्डन आदी भागात अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई सुरू आहे.
विशेष म्हणजे या कारवाईसाठी खुद्द महापालिकेच्या उपायुक्तही उतरल्याचे पाहायला मिळाले. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे, टपऱ्या हटविण्याची ही कारवाई स्वागतार्ह असली, तरी पूर्वानुभव पाहता या कारवाईचा परिणाम किती दिवस टिकेल हा मात्र प्रश्न आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने बुधवारी (ता. १८) सायंकाळी सहा ते रात्री नऊदरम्यान शहरातील बारापत्थक चौकात वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले. शिवाय या ठिकाणी रस्त्यावर बारापत्थर ते तहसील कार्यालयादरम्यान पांढरे पट्टे मारून तेथील विशेषतः गॅरेज व्यावसायिकांना या पट्ट्यांच्या बाहेर अतिक्रमण न करण्याची ताकीदही दिली. (Municipal alert machinery for encroachment removal encroachment removal team is taking action in city area Dhule News)
हेही वाचा: Jalgaon News : बाजार समितीतर्फे अवैध दुकाने बांधण्यास परवानगी
या कारवाईसाठी खुद्द महापालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकरदेखील उतरल्याचे पाहायला मिळाले. अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख प्रसाद जाधव यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माईनकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, संदीप मोरे, श्री. वाघ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
पांढऱ्या पट्ट्यांच्या बाहेर आल्यास साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीद तेथील व्यावसायिकांना दिली. दरम्यान, गुरुवारी (ता. १९) सकाळी पुन्हा पथकाने या भागात जाऊन पाहणी करून व्यावसायिकांना वाहतुकीला अडथळा न करण्याबाबत सूचना दिल्या. दरम्यान, या भागात मनपा शाळा क्रमांक ८ मध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
हेही वाचा: Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन
त्याअनुषंगाने शाळेजवळ अतिक्रमण हटविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी बारापत्थर व धुळे जिल्हा कारागृहाच्या कुंपण भिंतीस लागून असलेले व्यावसायिक अतिक्रमणधारकांना आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना केल्या तसेच टॉवर गार्डनजवळील अतिक्रमित जागेवरील गाडी पथकाने जप्त केली.
वॉल कंपाउंडवर जेसीबी
दरम्यान, बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने साक्री रोड परिसरातील प्रभाग क्रमांक सहामधील लक्ष्मीनगर येथे प्लॉट क्रमांक ११२ वरील श्री. पवार यांच्या घराचे वॉल कंपाउंडचे अतिक्रमणही काढले. अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख जाधव, संतोष घटी, राहुल फुलपगारे, उमाकांत बारी, शिरीष वाघ, जाकिर बेग, सनी दुर्धळे, भूषण अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा: Municipal Corporation News : दरमहा सहा लाख खर्च, शौचालय साफसफाईची बोंबाबोब