Dhule Crime News : चाकू भोसकून तरुणाचा खून; चौघांवर गुन्हा, तिघे अटकेत

murder news
murder newsesakal

धुळे : मागील भांडणातून मोहाडी उपनगर येथील दंडेवालेबाबानगरमध्ये चाकूने भोसकून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली. मृत तरुणाच्या आई, भावासह तीन जणदेखील जखमी झाले. अमोल विश्वास मरसाळे (वय २५ रा. दंडेवालेबाबानगर, मोहाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून, यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. (Murder of youth by stabbing Crime against four three arrested Dhule Latest Crime News)

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

murder news
Nashik News : लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये हिंदू संघटना आक्रमक!

दंडेवालाबाबानगर येथील रोकडोबा हनुमान मंदिरासमोर शनिवारी (ता. २६) रात्री आठ-साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मागील भांडणाची कुरापत काढून सुनील नंदू आव्हाळे, बबलू नंदू आव्हाळे, दिनेश सुभाष धनगर व सागर नंदू आव्हाळे (सर्व रा. दंडेवालेबाबानगर, मोहाडी) यांनी अजय विश्वास मरसाळे याला काल मंदिरावर असताना तू व जाकिरने माझ्या भावाशी वाद घातला होता. यापुढे जर तुम्ही नीट वागले नाहीत, तर तुम्हाला येथे राहणे मुश्कील करून टाकू, असे म्हणत त्यास मारहाण केली.

दरम्यान, सागर आव्हाडे याने त्याच्या पॅन्टच्या खिशातील चाकूने अजयची आई शोभाबाई तसेच मित्र जाकिर पिंजारी यांच्या डोक्यावर, तर भाऊ अमोल विश्वास मरसाळे याच्या डाव्या कानाजवळ वार केला. तसेच त्याच्या डाव्या पायाच्या मांडीवर चाकूने भोसकले यातच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अजय विश्वास मरसाळे, शोभाबाई विश्वास मरसाळे, जाकिर पिंजारी तिघेही जखमी झाले. या प्रकरणी अजय विश्वास मरसाळे याच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते, हेमंत राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, संशयितांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे तपास करत आहेत.

murder news
Nashik Crime News : महिलेस मारहाण करून 52 हजारांचा ऐवज लांबवला; भोकणी येथील घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com