Lok Sabha Election 2024 : ‘नंदुरबार’मध्ये पुन्हा खासदार हीना गावितच उमेदवार; भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा खासदार डॉ. हीना गावित यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे.
MP Dr. Heena Gavit
MP Dr. Heena Gavit esakal

Nandurbar News : भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा खासदार डॉ. हीना गावित यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. खासदार डॉ. गावित यांना उमेदवारी घोषित होताच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील आठही तालुक्यांमध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.(Nandurbar again MP Heena Gavit is same candidate for lok sabha election)

बुधवारी (ता. १३) रात्री सातला दिल्लीतून उमेदवारी घोषित होत असताना इकडे खासदार डॉ. गावित मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्यातील भटाणे येथे आदिवासी महिलांना वस्तूवाटप करण्यात मग्न होत्या.

डॉ. गावित यांना उमेदवारी घोषित झाल्याचे वृत्त पसरताच शिरपूर आणि शहादा मार्गावर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटून अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. (latest marathi news)

MP Dr. Heena Gavit
Nandurbar News : नंदुरबार-तळोदा रस्त्यावर धावत्या बसने घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

तर ऑल टाइम कार्यरत राहणाऱ्या त्यांच्या चाहत्या तरुण वर्गानेदेखील सोशल मीडियावर अभिनंदन आणि आनंद व्यक्त करणाऱ्या विविध पोस्टचा जणू पाऊस पाडला.

विश्‍वास सार्थ ठरवीन

भारतीय जनता पक्षाने मला सलग तिसऱ्यांदा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी करण्याची संधी दिली आणि तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचे मनापासून आभार मानते. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवीन, असे मत खासदार डॉ. हीना गावित यांनी व्यक्त केले.

MP Dr. Heena Gavit
Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातर्फे नंदुरबारात रूट मार्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com