Nandurbar News : बेडकी ते फागणे महामार्गाचे चौपदरीकरण संथगतीने; दशकापासून काम सुरू

Nandurbar News : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम कासवगतीने होत असल्याने वाहनधारकांची व प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.
The four-lane work of National Highway No. 6 is going on at a snail's pace.
The four-lane work of National Highway No. 6 is going on at a snail's pace.esakal

नवापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरणाचे काम कासवगतीने होत असल्याने वाहनधारकांची व प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. बेडकी ते फागणे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दशकापासून सुरू आहे. कामच पूर्ण होईना, हे रस्त्याचे काम आहे की धरणाचे जे पूर्ण होता होईना, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सुविधांपेक्षा दुविधा वाढत आहेत. त्यामुळे हे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी परिसरात जोर धरू लागली आहे. (Nandurbar Bedki to Phagane highway four lane work not completed yet)

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी दशकापूर्वी नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर हद्दीतील बेडकी ते जळगाव जिल्ह्यातील फागणे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू केले. रस्त्याच्या अर्ध्या कामातून पहिल्या ठेकेदाराने काही कारणास्तव काम मध्येच सोडले, त्यात कोरोना काळ आला आणि दोन वर्षे त्यात वाया गेली. या कामाला एक प्रकारे विघ्नेच जास्त आली.

कन्स्ट्रक्शन कंपनीने या रस्त्याचे काम सुरू केले तेव्हा वाटले गुजरातपेक्षा लवकर रस्ता निर्माण होईल मात्र ते दिवास्वप्न ठरले. रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. गेल्या मार्च २०२३ मध्ये नवापूरचे कोठडा व चिंचपाडा रेल्वे फाटक उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे कन्स्ट्रक्शन कंपनीने आश्वाशित केले होते. वर्ष उलटले मात्र उड्डाणपूल काही वाहतुकीसाठी खुला झाला नाही.

घोडे अडले कुठे हे समजायला मार्ग नाही. या दोन्ही रेल्वेफाटकांजवळ खूप वेळ वाया जातो. या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगला उड्डाणपूल लवकरात लवकर होणे गरजेचे झाले आहे. रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नवापूर-कोठडा रेल्वेफाटकाजवळ मार्च २०२३ पर्यंत उड्डाणपूल तयार होईल, तर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी जून २०२३ पर्यंत उड्डाणपुलाचे काम होईल, असे श्री. म्हात्रे यांनी सांगितले होते. एक वर्ष प्रतीक्षेत गेले. एप्रिल महिना सुरू झाला. उड्डाणपूल तयार झाला मात्र वाहतुकीसाठी काही खुला होईना. कोणत्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे अशी चर्चा आहे. (latest marathi news)

The four-lane work of National Highway No. 6 is going on at a snail's pace.
Nandurbar News : जन्म पुराव्याअभावी आधारकार्ड अपडेट कामात अडचण

धुळीचे साम्राज्य

नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणात रंगावली नदीवर भला मोठा पूल उभारला जात आहे. यात रंगावली नदीच्या पात्रात मातीचा भराव केल्याने या पावसाळ्यात नदीचे पाणी गावात शिरल्याशिवाय राहत नाही. पुलाचे कामही अत्यंत संथगतीने होत असल्याने देवळफली भागातील जनतेची डोकेदुखी ठरत आहे. आजूबाजूला उडणाऱ्या फुफाट्यामुळे, धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर दिवसातून कितीही वेळा पाणी मारा तरी काही वेळेतच फुफाटा उडतोच, यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे.

"नवापूर शहराजवळील कोठडा रेल्वे गेटजवळ उड्डाणपूल लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, तर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलही लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. जूनपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे."-जे. एम. म्हात्रे, इन्फ्रा प्रा. लि., पनवेल

The four-lane work of National Highway No. 6 is going on at a snail's pace.
Nandurbar Summer Heat Stroke : बोरद आरोग्यवर्धिनी केंद्रात उष्माघात कक्षाची स्थापना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com