Lok Sabha Election 2024 : नंदुरबार मतदारसंघावर 35 वर्ष काँग्रेसचे वर्चस्व

Lok Sabha Election 2024 : १९८० पासूनचा विचार केल्यास नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे सर्वाधिक ३५ वर्षे वर्चस्व होते.
Congress
Congressesakal

Lok Sabha Election 2024 : गेल्या १९८० पासूनचा विचार केल्यास नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे सर्वाधिक ३५ वर्षे वर्चस्व होते. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेला नंदुरबार मतदारसंघ हा २०१४च्या निवडणूकीतील विजयापासून भाजपचा गड बनू लागला आहे. यावर्षीच्या निवडणूकीत कोणता पक्ष वर्चस्व राखतो हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. नंदुरबार जिल्हा निर्मिती होऊन पंचवीस वर्षे होत असले तरी या मतदारसंघाचा विचार केल्यास हा काँग्रेसच्या पारंपारिक बालेकिल्ला राहिला आहे. (Nandurbar Congress dominated Lok Sabha constituency for longest period of 35 years)

आदिवासी मतदारांची ६० टक्के संख्या असलेला हा मतदारसंघ कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. या जिल्ह्यावर काँग्रेसच्या नेत्या स्व इंदिरा गांधी यांच्यापासून आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांचे विशेष लक्ष राहिले आहे. आदिवासी समाजासाठीच्या अनेक कल्याणकारी योजना काँग्रेसच्या राजवटीत राबवल्या गेल्याने येथील मतदार काँग्रेसचा हक्काचा बनला होता.

१९८० च्या निवडणूकीत काँग्रेसतर्फे सुरुपसिंग नाईक यांनी एक हाती विजय मिळवीला होता. तेव्हापासून २०१४ पर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले होते. १९८४ ची निवडणूक माणिकराव गावित यांनी लढवली. तेव्हापासून तर २०१४ पर्यंत काँग्रेसचे खासदार म्हणून त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. (latest marathi news)

Congress
Nashik Lok Sabha Election : काँग्रेसच्या मैदानात शिवसेनेचा चौकार; नाशिक लोकसभा

काँग्रेसचे टॉप टेन खासदार म्हणून गावित यांची ओळख होती. मात्र २०१४ मध्ये आलेली मोदी लाट परिवर्तनाची नांदी ठरली. २०१४ मध्ये भाजपने तरुण व सुशिक्षित उमेदवार म्हणून डॉ. हिना गावित यांना उमेदवारी दिली. त्याच काळात डॉ. हिना यांचे वडील राज्यात मंत्री होते. त्यांच्या विकासकामांचा फायदा डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीला झाला.

त्यामुळे २०१४ ला भाजपच्या माध्यमातून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लागला. डॉ. हिना गावित मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. २०१९ च्या निवडणुकीतही त्या पुन्हा ९५ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसतर्फे धडगावचे आमदार ॲड. के. सी. पाडवी उमेदवार होते. त्यांच्या कामाची दखल घेत भाजपने पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.या निवडणूकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

Congress
Nandurbar Summer Heat : उन्हाची तीव्रता वाढताच लिंबू शिकंजीच्या हातगाड्यांवर गर्दी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com