द्राक्षबागांवर शेतकरी चालवत आहेत कुऱ्हाड !

माणिक देसाई
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

अवकाळी पावसामुळे नारायणटेंभी परीसरातील द्राक्ष बागेचे प्रचंड नुकसान झाले -हे नुकसान कधीही न भरून निघणारे असे आहे. झालेल्या नुकसानाला  कंटाळून द्राक्ष बागेवर अतिशय जड अंतकरणाने कुऱ्हाड चालवावी लागली
- सुभाष गवळी, मुक्ताई बँक व्यवस्थापक गवळी

निफाड : पोटच्या पोरागत वाढवलेल्या द्राक्षबागांची मागील महिन्यात परतीच्या पावसाने धुळधाण झाली आहे.  निफाड तालुक्यातील नारायणटेंभीसह अन्यही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी बागा फेल गेल्याने हिरव्या स्वप्नांवरती पाणि फेरल्यामुळे जड अंतकरणाने द्राक्षबागांवरती कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे .

निफाडच्या द्राक्षपंढरीला परतिच्या पावसान मोठ नुकसान झाल आहे या पावसान होत्याच नव्हत करुन टाकल पावसान घडकुज झाल्याने रानची रान वाया गेलीआहे त्यामुळेच निफाड तालुक्यातील नारायन टेभी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी  गणपतराव  गवळी यांच्या  गट नंबर 22 मधील 32 आर क्षेत्रातील   तास ए गणेश  जातीच्या तसेच सुभाष गणपतराव गवळी गट नंबर 25 जात थामसन क्षेत्र 55 आर पूर्णपणे कुज होऊन आज मितीस एक घडसुध्दा बागेवर शिल्लक नसल्यामुळे उभ्या बागांवर कुऱ्हाडीचे घाव घातल्याचे वास्तव असून याच गावातील नुकसान ग्रस्त शेतकरी सदाशिव भगवंत गवळी, कैलास उतम गवळी, संदिप अशोक गवळी, साहेबराव गणपत गवळी, निवृत्ती वामन गवळी, वामन चिमण गवळी, प्रकाश केशव गवळी, हनुमंत राधाजी गवळी, संदीप सोपान गवळी यांचेदेखील मोठे नुकसान झाल्याने सरकारने तरी याची दखल घेत शेतकऱ्याना उभ राहण्यासाठी पुढ यायला हवे अशी आर्त मागणी होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nashik news niphad farmer grape farm

टॅग्स