Ashok Kataria Defamation Case: उद्योजक अशोक कटारियांकडून सुगंधींविरुद्ध 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

100 crore Defamation claim against Sugandhi by entrepreneur Ashok Kataria nashik news
100 crore Defamation claim against Sugandhi by entrepreneur Ashok Kataria nashik news

Ashok Kataria Defamation Case: प्रसिद्ध उद्योजक अशोक कटारिया यांनी सिन्नर तालुक्यात शेतकरी असल्याचे बनावट पुरावे देऊन मोठ्या प्रमाणात शेतजमीन घेतल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन सुगंधी यांनी केल्यावर त्यांच्या विरोधात कटारिया यांनी नाशिकच्या दिवाणी न्यायालयात धाव घेऊन १०० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती त्यांचे वकील सुनील रंकावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्याचबरोबर सुगंधी यांना वृत्तपत्रांसह समाज माध्यमांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यास मनाई केल्याचा दावा करण्यात आला.

दरम्यान, यासंदर्भात सुगंधी यांनी माझ्याविरुद्ध कुठलाही असा दावा दाखल झाल्याची नोटीस किंवा समन्स न्यायालयाकडून आले नसल्याचा खुलासा केला आहे. (100 crore Defamation claim against Sugandhi by entrepreneur Ashok Kataria nashik news)

अशोका युनिव्हर्सल स्कूलमध्ये शनिवारी (ता. २३) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ॲड. रंकावत म्हणाले, की २५ नोव्हेंबरला नितीन सुगंधी यांनी पत्रकार परिषदेत अशोक कटारिया यांच्याविरुद्ध शेतकरी पुरावा नसताना सिन्नर तालुक्यात शेतजमीन विकत घेतल्याचे व सिन्नर तहसीलदार यांनी २०२२ मध्ये कटारिया यांच्या मालकीच्या शेतजमिनी सरकार जमा करण्याचे निराधार आरोप लावले.

कटारिया यांची विपरित हेतूने जाहीर बदनामी करण्यात आली आहे. या संदर्भात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याने बदनामी झाली. त्यामुळे कटारिया यांनी सुगंधी यांच्याविरुद्ध १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. २२ डिसेंबरला न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्याचबरोबर १२ जानेवारीला सुगंधी यांना न्यायालयाने हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत, अशी माहिती ॲड. रंकावत यांनी दिली.

३१ मे २०२३ ला सिन्नर तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात जून २०२३ मध्ये आव्हान देण्यात आले. व स्थगन आदेश दिलेला आहे. या संदर्भात माहिती असूनही सुगंधी व अन्य हितसंबंधित व्यक्तींनी हेतूपुरस्सर वैयक्तिक आकांक्षेपोटी व विपरीत हेतूने जाणीवपूर्वक बदनामी केली आहे.

100 crore Defamation claim against Sugandhi by entrepreneur Ashok Kataria nashik news
Salim Kutta Dance Case: सलिम कुत्ताने गाठले पार्टीतून थेट कारागृह

कटारिया यांनी संपूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व योग्य ते पुरावे सादर करून ३४ वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यात जमीन विकत घेतली आहे. त्यांचा उत्कर्ष झाल्याने मनस्ताप व्हावा म्हणून त्यांच्या बदनामीचे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा वकिलांतर्फे करण्यात आला.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न

या संदर्भात नितीन सुगंधी यांनीही माध्यमांशी संवाद साधून खुलासा केला. श्री. कटारिया व त्यांच्या वकिलांच्या माहितीप्रमाणे असा कुठलाही दावा माझ्याविरुद्ध दाखल झाला नसल्याची नोटीस किंवा समन्स न्यायालयाकडून बजावण्यात आलेले नाही. सद्य परिस्थितीत अशा कुठल्याही दाव्यात मी प्रतिवादी म्हणून सहभागीही नाही.

बेकायदेशीर जमीन घेतली व खरेदी जमीन बेकायदेशीर ठरून सरकारजमा झाली, तर त्यात कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा बदनामी होण्याचा संबंध येत नाही. कारण जमीन सरकारजमा होते. व्यक्तीला सरकारजमा करता येत नाही. त्यामुळे कटारिया व त्यांच्या वकिलांनी दिलेली माहिती दिशाभूल करण्याचा प्रयत्न असू शकतो, असा दावा सुगंधी यांनी केला.

100 crore Defamation claim against Sugandhi by entrepreneur Ashok Kataria nashik news
Nashik News: उद्योजक अशोक कटारियांकडून फसवणूक; नितीन सुगंधी यांचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com