11th Admission : ‘वाणिज्य’चा कट-ऑफ यंदा विज्ञानपेक्षा वरचढ! प्रवेशाची उद्यापर्यंत मुदत

 admission
admissionesakal

11th Admission : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सोमवारी (ता. ३) प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत चार हजार ८९० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

विज्ञान शाखेत प्रवेशाची चुरस बघायला मिळत असली, तरी बीवायके महाविद्यालयातील अनुदानित जागेसाठीचा कट-ऑफ (८८.६० टक्‍के) हा आरवायकेतील विज्ञान शाखेच्‍या कट-ऑफपेक्षा (८६.२० टक्‍के) अधिक राहिला आहे. दरम्यान, निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बुधवार (ता. ५)पर्यंत मुदत असणार आहे. (11th Admission cut off of Commerce higher than Science this year Deadline for entry is tomorrow nashik)

नाशिक महापालिका क्षेत्रातील ६५ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी राबविल्‍या जात असलेल्‍या केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सोमवारी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. पहिल्‍या यादीच्‍या तुलनेत दुसऱ्या यादीतील कट-ऑफ आणखीच खालावला आहे.

असे असले, तरी विज्ञान शाखेतून नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची चुरस कायम बघायला मिळत आहे. पंधरा हजाराहून अधिक जागा रिक्‍त असताना पात्रतेच्‍या आधारे अवघ्या चार हजार ८९० विद्यार्थ्यांची निवड या यादीत केलेली आहे.

कोट्याच्‍या जागांवर प्रवेश

दरम्‍यान, इनहाउस कोट्यातील १ हजार ९९४ जागांसाठी ४०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अल्‍पसंख्याक कोट्यातील १ हजार ३२० जागांसाठी ३५७ प्रवेश झाले असून, व्‍यवस्‍थापन कोट्यातील ९०४ जागांसाठी अवघे दोन प्रवेश झाले आहेत.

चार हजार विद्यार्थ्यांची झाली नाही निवड

ऑप्शन दोन भरुन पर्याय नोंदविलेल्‍या ८ हजार ८२८ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ८९० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर उर्वरित ३ हजार ९३८ विद्यार्थ्यांची निवड कुठल्‍याही महाविद्यालयासाठी करण्यात आलेली नाही. प्राधान्‍यक्रमाचा विचार केल्‍यास निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक २ हजार ५१४ विद्यार्थ्यांना पहिल्‍या प्राधान्‍याचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या प्राधान्‍याचे महाविद्यालय १ हजार ०१९ विद्यार्थ्यांना, तर तिसऱ्या प्राधान्‍याचे महाविद्यालय ५८० विद्यार्थ्यांना मिळाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 admission
YCMOU Admission: मुक्‍त’च्‍या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी 31 पर्यंत मुदत; प्रवेश प्रक्रिया सुरु

दुसऱ्या फेरीची शाखानिहाय स्‍थिती

शाखा रिक्‍त जागा नोंदणीकृत विद्यार्थी निवडलेले विद्यार्थी

विज्ञान ६,१९९ ४,९९४ २,७३२

वाणिज्‍य ४,९८१ २,२८८ १,३२५

कला ३,२५३ १,४३६ ७४७

एचएसव्‍हीसी ८५४ ११० ८६

महाविद्यालयनिहाय विज्ञान शाखेचा कट-ऑफ

(अनुदानित, खुला प्रवर्ग, इंग्रजी माध्यम जागेसाठी)

आरवायके-------------८६.२० टक्‍के

केटीएचएम-----------८४.४० टक्‍के

पुरुषोत्तम महाविद्यालय-- ८४.८० टक्‍के

एलव्हीएच (पंचवटी) महाविद्यालय---८२.६० टक्‍के

बिटको महाविद्यालय (नाशिक रोड)----८१.०० टक्‍के

केएसकेडब्‍ल्‍यू (सिडको)--------८५.४० टक्‍के

भोसला महाविद्यालय-------८३.२० टक्‍के

व्‍ही. एन. नाईक (विना अनुदानित)---७९.४० टक्‍के

एचपीटी, बीवायकेचा कट-ऑफ अधिकच

कला व वाणिज्‍य शाखेत प्रवेशासाठी बहुतांश महाविद्यालयांचा कट-ऑफ खालावलेला आहे. त्‍यातच एचपीटीमध्ये अनुदानित जागेसाठी कला शाखेचा कट-ऑफ ८२.६ टक्‍के, तर बीवायकेमध्ये वाणिज्‍य शाखेचा कट-ऑफ ८८.६० टक्‍के आहे.

वाणिज्‍य शाखेतून केटीएचएमएचा ७७ टक्‍के, केएसकेडब्‍ल्‍यूचा ७२.२ टक्‍के, तर भोसला महाविद्यालयाचा कट-ऑफ ७९.६० टक्‍के राहिला आहे. कला शाखेत केटीएचएमचा कट-ऑफ ७०.४ टक्‍के आहे.

 admission
Dhule Political News : धुळे लोकसभा; काँग्रेस- राष्ट्रवादीच्या निर्णयावर लढतीचे भवितव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com