Nashik Rain Update : वीज कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू तर 1 जण जखमी

Death News
Death Newsesakal

Nashik News : बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील गावानजीक असलेल्या कांदा चाळीजवळ उभा असलेल्या पवन रामभाऊ सोनवणे (वय१२) या मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तर वाहनातील कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी फ्लाॅस्टिक टाकत असलेले गंगाराम सखाराम मोरे (वय४२) जखमी झाले असून त्यांच्यावर सटाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (12 year old boy died and 1 person was injured due to lightning strike Nashik News)

वातावरणात सकाळपासूनच बदल होत असतानाच परिसरात मेघगर्जनेसह जोरदार वादळी वारा व मान्सूनपूर्व रिमझिम पावसाने हजेरी लावली. बहुतांश ठिकाणी वादळामुळे घरांचे नुकसान झाले असून वीज पुरवठाही खंडित झाला होता.

दरम्यान बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील गावानजीक असलेल्या शेतकरी गंगाराम सखाराम मोरे हे कांदा चाळीतील कांदा वाहनात भरत असतानाच अचानक पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने वाहनातील कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनावर फ्लाॅस्टिकचे आवरण टाकत असतानाच वीजेचा मोठा आवाज झाला.

Death News
Crime News: प्रेमविवाहाचा शेवट झाला दुर्दैवी; पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने उचललं टोकाचं पाऊल

वाहनाशेजारी उभा असलेल्या पवन सोनवणेवर वीज कोसळली तर शेतकरी गंगाराम मोरे यांनाही जोरदार झटका लागल्याने जखमी झाले.

सरपंच केदा शिरसाठ व ग्रामस्थांनी तातडीने सटाणा येथील शासकीय रुग्णालयात दोघांना उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय आधिका-यांनी पवन सोनवणे याची तपासणीनंतर मृत झाल्याचे घोषित केले.

तर जखमी अवस्थेत असलेल्या गंगाराम मोरेवर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय आधिकारी डाॅ. पवन मोरटकर यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात खबर दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Nashik News : स्वामी कार्य गावागावात पोहोचविल्यास रामराज्य येईल : गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे

सातवीत शिक्षण घेत असलेल्या पवनवर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अत्यंत शोकाकुल वातावरणात देवळाणेत सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक नवनाथ रसाळ करीत आहेत.

Death News
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com