esakal | BREAKING : मदतीचा टाहो..भारतातील १७ विद्यार्थी बँकॉक विमानतळावर अडकले..मालेगावचे 3 विद्यार्थी
sakal

बोलून बातमी शोधा

students in bankon.jpg

बँकॉकच्या महाराष्ट्र मंडळाने त्यांना सहारा दिला मात्र हे विद्यार्थी भारतात येण्यासाठी मदतीसाठी टाहो फोडला आहे. भारतीय अमिराती आणि राज्य शासनाच्या मदतीने या विद्यार्थ्यांना विशेष सवलत मिळावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

BREAKING : मदतीचा टाहो..भारतातील १७ विद्यार्थी बँकॉक विमानतळावर अडकले..मालेगावचे 3 विद्यार्थी

sakal_logo
By
घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

मदतीचा टाहो..भारतातील १७ विद्यार्थी ठायलंडला अडकले


नाशिक : भारतातून हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणासाठी थायलंड येथे गेलेले १७ विद्यार्थी कोविड-19च्या लॉकडाउनमुळे विमानतळावर अडकून पडले आहेत. राज्यातील ११ मुलांमध्ये मालेगावचे तीन विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.बँकॉक महाराष्ट्र मंडळाच्या तात्पुरत्या सुविधेमुळे ही मुले सुरक्षित असली तरी त्यांना भारतात येण्यासाठी जीवाचा आकांत करावा लागत आहे.

राज्यातील अकरा मुलांमध्ये मालेगावचे तीन विद्यार्थी
भारतातून हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी थायलंड येथे पथ्यूमथानी विद्यापीठात गेलेले १७ विद्यार्थी तेथील लोकडाऊन मुळे निवासस्थान सोडावे लागले आहे. हे विद्यार्थी बँकॉक विमानतळावर अडकले असून त्यात राज्यातील अकरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.आहे. बँकॉकच्या महाराष्ट्र मंडळाने त्यांना सहारा दिला मात्र हे विद्यार्थी भारतात येण्यासाठी मदतीसाठी टाहो फोडला आहे. भारतीय अमिराती आणि राज्य शासनाच्या मदतीने या विद्यार्थ्यांना विशेष सवलत मिळावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. राज्यातील अकरा विद्यार्थ्यांमध्ये मालेगावचे तीन विद्यार्थी असून एकूण पंधरा मुले व दोन मुलींचा त्यात समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना चिंतेने ग्रासले आहे.

सरकारने मदत मिळवून द्यावी.अशी मागणी

विमानाचे तिकीट काढले मात्र तेही रद्द झाले. आता त्यांच्या जवळील पैसेही संपल्याने त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का, अशी बनली आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना त्यांनी सोशल मीडियाद्वारे साकडे घातले आहेत. मात्र अत्यल्प संपर्क साधनांमुळे संपर्क होण्यात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मालेगाव येथील विद्यार्थी हृषीकेश बच्छाव याने 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. दरम्यान या विद्यार्थ्यांचे पालक देशातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. लेकरांना सुरक्षित भारतात आणावे अशी आर्त साद घातली जात आहे.

थायलंड विमानतळावर अडकलेल्या विद्यार्थ्यांची नावे.

दिपक रमेश जहिरे (हाताने) मालेगाव,
संदीप भिकनसिंग निकुभ(रा.रायतेल,धुळे)
ऋषिकेश भरत बच्छाव (सोयगांव, मालेगाव), कुणाल सजयराव मानकर (वर्धा), सुरज रहेजा (रायपूर, जिल्हा.छत्तीसगड), अलदिन भरोसा (शिवणी, मप्र), विलासागर मणिदीप (कोडीमाल, तेलंगणा), कार्तिक अनिल फाले (नागपुर, महाराष्ट्र), योगिता सुरेश गाई (टेलांगखडी महाराष्ट्र), साक्षी सुरावर (भद्रावती, चंद्रपूर), मोहम्मद मनस (भगवद खुर्द, राजस्थान), मेघा बिस्वास (दिल्ली), अविनाश अनिल कुमार (तिरुवानंतपुरम, केरळ), विशालसिंग भाटी (उदयपूर, राजस्थान),  मयंक विजय (दिल्ली), रोहित मोहन सिंह (उदयपुर, राजस्थान), चिमन सिंह बैवर, (राजस्थान)

हेही वाचा > मालेगावात आणखी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह.. २४ तासात ९ कोरोनाबाधित रुग्णांची भर...

विद्यार्थ्यांची विनंती

दरम्यान आम्हाला ऋषिकेश बच्छाव 976601072 संदीप राजपूत +660951719846  या दूरध्वनीवरून मदत कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण