Nashik News : 2 उड्डाणपूल, मेडिकल कॉलेजची उपलब्धी, सिंहस्थाचा शंखनाद

नाशिकच्या धार्मिक नगरीत मुख्य स्थान असलेल्या पंचवटीमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.
kumbh mela
kumbh melaesakal

Nashik News : नाशिकच्या धार्मिक नगरीत मुख्य स्थान असलेल्या पंचवटीमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे विकासकामांचा नारळ या वर्षात फुटणे अपेक्षित होते. परंतु तो फुटला नाही. नाही म्हणायला शासनाने दखल घेतली हेदेखील महत्त्वाचे आहे. धार्मिक नगरीत गुन्हेगारी कारवाया इतर विभागांच्या तुलनेत घटल्या. राजकीय पातळीवर भाजपच एक नंबर राहिला. उलट पक्षाची ताकद वाढली.

विकासाच्या बाबतीत बोलायचे तर पेठ रोड काँक्रिटीकरणाला ७० कोटी रुपयांची मिळालेली मंजुरी व छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नांदूर व मिरची चौकात मंजूर झालेले दोन उड्डाणपूल महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर आडगाव येथे मेडिकल कॉलेज व रुग्णालयाला मिळालेली मान्यता विकासाच्या अंगाने महत्त्वाची आहे.- योगेश मोरे (2 Flyover Medical College Achievement Simhastha Shankhnaad in nashik recap 2023 news)

पंचवटी विभागाला सिंहस्थ, रामकुंड व धार्मिक स्थळांमुळे वरदान मिळाले आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या अंगाने विचार करता या भागात भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते. २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याची तयारी म्हणजेच किमान काही कामांचा नारळ फुटणे अपेक्षित होते तो फुटला नाही.

परंतु शासनाने सिंहस्थासाठी शिखर कमिटी नियुक्ती केली. विशेष म्हणजे कमिटी नियुक्त करताना थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे नियंत्रण राहणार असल्याने सिंहस्थाच्या कामाला गती येणार आहे. हे महत्त्वाचे आहे. महापालिकेने जवळपास ११ हजार कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यामुळे मंजुरी मिळून पुढील वर्षी सिंहस्थाच्या कामांचा नारळ फुटेल, अशी अपेक्षा आहे.

आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रयत्नांनी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अपघातांमुळे पाच किलोमीटरच्या अंतरावर दोन उड्डाणपूल मंजूर झाल्याने या भागातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या महापालिका हद्दीतील पेठ रोडच्या बाजूला असलेल्या रहिवाशांना दारे बंद करून वावरावे लागते. त्यावर उपाय म्हणून शासनाकडून ७० कोटी रुपये मंजूर करून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यास मंजुरी मिळाल्याने हा प्रश्‍न मिटला ही बाब महत्त्वाची ठरली.

kumbh mela
Nashik News: आरोग्यदायी आहारासाठी मातीच्या भांड्यांचा वापर; मिळतात पौष्टिक अन् पोषक तत्त्वे

शासनाने मंजूर केलेले मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल पंचवटी विभागाला आर्थिक सक्षमतेकडे नेणारे ठरेल. स्वामीनारायण मंदिरामुळे पंचवटीच्या धार्मिक पर्यटन अधिक बळकट होणारे ठरले. राजकीय पातळीवर भाजप अधिक भक्कम झाला आहे. शिवसेनेच्या उबाठा गटाचा एकमेव माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्याने उबाठाची पाटी कोरी झाली आहे. भाजपसमोर जवळपास सर्वच पक्षांचे सुपडे साफ दिसतं आहे.

महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत मरगळ आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन पर्यटक हब, पंचवटी, मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर मानूर आदी भाग व पंचवटी विभागातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये रस्ते, उद्या उद्यान काँक्रिटीकरण खडीकरण समाजमंदिरे असे अनेक विकासकामे आमदार निधीतून सुरू आहेत.

यामुळे भाजपची प्रतिमा ही पंचवटीमध्ये चांगली असून सर्व सामान्यांच्या मदतीला धावणारा आमदार अशी त्यांची ख्याती तयार झाली आहे. अधूनमधून आजी-माजी आमदार यांच्यातील शीतयुद्ध दिसले. इतर विभागांच्या तुलनेत पंचवटी विभागात गुन्हेगारी घटल्याचे दिसले. पंचवटी, म्हसरूळ व आडगाव हे तिन्ही पोलिस ठाणे असल्याचा हा परिणाम असू शकतो.

kumbh mela
Nashik News : निधी खर्चासाठी यंत्रणांची धावपळ; प्रस्ताव पाठवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com