Guru Paurnima: 24 तास रांगोळी रेखाटून साकारले हुबेहूब स्वामी समर्थ! सावरगाव येथील केंद्रात वैष्णवीची किमया

A picture of Swami Samarth Maharaj drawn from a rangoli by Vaishnavi Vagh, a young woman.
A picture of Swami Samarth Maharaj drawn from a rangoli by Vaishnavi Vagh, a young woman.esakal

Guru Paurnima : रांगोळी कला तशी सोपी नाही मात्र सरावातून ती कोणीही आत्मसात करू शकते. पण याच रांगोळीने हुबेहूब चित्र काढणे मात्र अजिबातही सोपे नाही. पण कठोर परिश्रमातून ही किमया साध्य केली आहे ती मालेगाव येथील वैष्णवी वाघ या मुलीने..!

गुरुपौर्णिमेनिमित्त आज सावरगाव येथील स्वामी समर्थ केंद्रात तिने तब्बल २४ तास वेळ देऊन रांगोळीतून अगदी हुबेहूबपणे स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा साकारून सर्वांचे लक्ष वेधले. (24 Hours Rangoli Drawing Realized Swami Samarth Alchemy of Vaishnavi at center in Savargaon on guru paurnima nashik)

स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सावरगाव येथील पुरातन मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

याच निमित्त मालेगाव येथील वैष्णवी वाघ या बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने तब्बल २४ तास वेळ देऊन अगदी चित्राप्रमाणे हुबेहूब स्वामी समर्थांची रांगोळी काढली असून ही रांगोळी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. किंबहुना रांगोळीच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी होताना दिसली.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शनिवारी दुपारी २ ते रात्री नऊपर्यंत तीने रांगोळी काढली तर पुन्हा रविवारी सकाळी ९ ते रात्री दहापर्यंत पूर्णवेळ देऊन ही मुलगी सदरची रांगोळी काढत होती.

विशेष म्हणजे आज चित्र पाहून अगदी रंगसंगती सुद्धा तिने जुळवल्याने क्षणभर ही रांगोळी नाहीच असे पाहणाऱ्याला वाटते इतकी हुबेहूब कलाकृती सावरगाव येथील स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्या सभागृहात तिने काढली आहे.

मालेगाव येथील स्वामी भक्त विजय वाघ मागील ३०-३२ वर्षापासून सावरगाव येथील स्वामी समर्थांची भक्ती करतात. त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी वैष्णवी नियमितपणे येथे दर्शनाला येते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही रांगोळी काढल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, दत्तू पवार, श्री. भुरुक तसेच, सावरगाव विद्यालयाचे प्राचार्य मारोती अलगट, ज्येष्ठ शिक्षक गजानन नागरे, वसंत विंचू आदींनी या रांगोळीचे कौतुक केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A picture of Swami Samarth Maharaj drawn from a rangoli by Vaishnavi Vagh, a young woman.
Guru Paurnima: श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ! गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूपूजनासाठी भाविकांची गर्दी

मंदिरात दर्शनासाठी गर्दी!

सावरगाव येथे स्वामी समर्थ महाराजांनी वास्तव्य केल्याने येथील केंद्रात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक भाविक येथे आले असल्याने सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मुंबई येथूनही काही भाविक दर्शनासाठी येथे आलेले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी निमगाव मढ येथील लभडे महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला.

संभाजी पवार, तुकाराम महाराज पवार, अंबादास निकम, दत्तात्रय पवार, नारायण काटे, अशोक भुरूक, जालिंदर पवार, सुमन लिंगायत, मोतीराम पवार, राजवाडेबाबा, भाऊ काटे आदींसह स्वामी समर्थ भक्त परिवाराने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.

मालेगाव येथील भक्त वैष्णवी वाघ या युवतीने रांगोळीतून स्वामी समर्थ महाराजांचे चित्र काढून भक्तिभाव दर्शविला. सर्व भाविकांनी याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

- संभाजी पवार, माजी सभापती, येवला

A picture of Swami Samarth Maharaj drawn from a rangoli by Vaishnavi Vagh, a young woman.
Guru Paurnima: देश, परदेशातील समर्थ केंद्रावर गुरुपौर्णिमेचा अमाप उत्साह! केंद्रांवर लाखो भाविकांची मांदियाळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com