महापालिका आरोग्य विभाग कोरोनाच्या कचाट्यात; स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता

ऑक्सिजन बेड व रेमडेसिव्हिर औषधांच्या कमतरतेनंतर पाठोपाठ नवे संकट पालिकेसमोर निर्माण होताना दिसत आहे
nashik muncipal corporation
nashik muncipal corporation

नाशिक : शहराचे आरोग्य स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागातील तब्बल २५३ कामगार आतापर्यंत कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याने स्वच्छतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ऑक्सिजन बेड व रेमडेसिव्हिर औषधांच्या कमतरतेनंतर पाठोपाठ नवे संकट पालिकेसमोर निर्माण होताना दिसत आहे.

३१ जणांवर अद्यापही उपचार सुरू

सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, रस्त्यांची झाडलोट, कचरा संकलन करणे आदी शहराचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्याचे काम आरोग्य विभागामार्फत होते. गेल्या वर्षभरापासून कुठलीही तक्रार न करता स्वच्छतेची कामे सुरू आहेत; परंतु शहराचे आरोग्य सुस्थितीत ठेवताना स्वच्छता कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची बाधा झाली आहे. घनकचरा विभागात १६२ कर्मचारी बाधित झाले. उपचाराअंती १२७ बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३१ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. चौघांचा मृत्यूने कवटाळले. शहरातील सहा विभागांमध्ये १६५ घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन केले जाते. घंटागाड्यांवर साडेनऊशेहून अधिक कर्मचारी काम करतात. त्यातील ५७ जण कोरोनाने बाधित झाले आहेत. ४० जण बरे झाले असून, १५ जणांवर उपचार सुरू आहेत. दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पूर्व, पश्‍चिम विभागात आउटसोर्सिंगच्या माध्यमातून रस्त्यांची झाडलोट केली जाते. खासगी ठेकेदाराकडील एकूण कर्मचाऱ्यांपैकी पन्नास बाधित झाले, तर त्यातील ३५ बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १४ स्वच्छता कर्मचारी उपचार घेत असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. स्वच्छतेचे काम करणारे २६३ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले असून, २०२ बरे झाले, तर ६० जण उपचार घेत आहेत. सात स्वच्छता कर्मचाऱ्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले.

nashik muncipal corporation
नातेवाइकांचा आक्रोश अन्‌ हुंदके पावलोपावली! अमरधाममध्ये हृदय पिळवटून टाकणारे दृश्य

शहराचे आरोग्य धोक्यात

स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाते. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, तातडीने लसीकरण करणे गरजेचे आहे. स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी होत आहे.

nashik muncipal corporation
नाशिकच्या वालदेवी धरणात सहा जण बुडाले; पोलिसांचे शोधकार्य सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com