Nashik News : मालेगावमध्ये एका वर्षात 319 कोटींची वीजचोरी; शहराच्या विकासात अडथळा

मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीचे वर्षाला तब्बल ३१९ कोटी रुपयांचे होत असलेले नुकसान कसे भरून निघणार? हा यक्षप्रश्न कंपनीला सतावत आहे.
electricity theft
electricity theftsakal

Nashik News : शहरातील वीजचोरीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीचे वर्षाला तब्बल ३१९ कोटी रुपयांचे होत असलेले नुकसान कसे भरून निघणार? हा यक्षप्रश्न कंपनीला सतावत आहे.

पोलिस यंत्रणेचे सहकार्य योग्य प्रकारे मिळत नसल्याने वीजचोरांना आळा घालण्यासाठी कंपनीला सातत्याने अपयश येत आहे. (319 crore electricity theft in Malegaon in one year nashik news)

मालेगावच्या विकासातील हा अडथळा दूर व्हावा, ही प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या सर्वसामान्य वीज ग्राहकांची अपेक्षा आहे. शहरात सव्वा लाख वीज ग्राहक असून, पैकी सुमारे ८७ हजार ग्राहक हे मालेगाव मध्य विधानसभा क्षेत्रात आहेत. ३८ हजार ग्राहक मालेगाव बाह्य मतदारसंघातील असून, शहरात गेल्या तीन वर्षांत सात हजार १०० वीजचोरीच्या कारवाया झाल्या.

लोकसंख्येच्या तुलनेत झालेली राज्यातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी सध्या दिवसाला एक केस दाखल करीत आहे. मात्र, कारवाई केलेल्यांपैकी ४५ टक्के वीज ग्राहक थकबाकी भरतात, ५५ टक्के लोक पुन्हा वीजचोरीकडे वळतात. त्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडत नाही.

electricity theft
Nashik News : सिन्नरमधील वाहतूक कोंडी सुटली; नायलॉन दोरीचा प्रयोग

सात हजार १०० वीजचोरांपैकी केवळ २८५ वीजचोरांवर गेल्या तीन वर्षांत एफआयआर दाखल झाला आहे; तर २८५ पैकी केवळ २१ वीजचोरांविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आली; तर केवळ एका वीजचोराला समन्स बजावण्यात आला. या एका वीजचोराचा अद्याप कोणताही माग मिळालेला नाही. या गंभीर स्थितीमुळे मालेगाव वीज कंपनी प्रचंड अचडणींचा सामना करीत आहे.

वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे, मारहाण करण्याचे, शिवीगाळ करण्याचे अनेक प्रसंग घडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मालेगाव शहरातील वीजचोरीचे प्रमाण हे तब्बल ४० टक्क्यांपर्यंत आहे.

electricity theft
Nashik News : ‘ग्‍लॅमर’ व पैसा येईल, तेव्‍हाच खेळांचा विकास होईल : मिर रंजन नेगी

असाही एक प्रसंग...

गेल्या काही महिन्यांमध्ये मालेगाव वीज कंपनीने २० वीज चोरांवर कठोर कारवाई करीत छेडछाड केलेले २० मीटर जप्त केले. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीत या अवैध वीज वापरकर्त्यांना हे मीटर परत करण्यात आले.

कुठे होते वीजचोरी?

- शंभराहून अधिक अवैध प्लास्टिक कारखाने

- या कारखान्यांमध्ये १०० टक्के वीजचोरी

- पॉवर लूममध्ये सुमारे २५ टक्के वीजचोरी

- घरगुती ग्राहकांकडून ६५ टक्के वीजचोरी

electricity theft
Nashik News : नाशिक बनणार लॉजिस्टिक्स हब : रामप्रवीण स्वामिनाथन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com