मुंबई-आग्रा महामार्गावर 48 लाखांचा अवैध गुटखा जप्त

Panmasala
Panmasalaesakal

देवळा (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील देवळा तालुक्यातील उमराणेजवळ राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित पानमसाल्याची (Panmasala) अवैध वाहतूक करणारा कंटेनर देवळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडला असून, 47 लाख 90 हजार रुपयांचा पानमसाला आणि 25 लाख रुपयांचा कंटेनर असा सुमारे 72 लाख 90 हजारांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. कंटेनरचालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 48 lakh illegal gutka seized on Mumbai-Agra highway

10 टायर कंटेनरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक

राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. त्यांनी याआधारे देवळा पोलिसांना सापळा रचण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस शिपाई नीलेश सावकार यांना राजस्थानमधून मालेगावकडून उमराणेकडे एक तपकिरी रंगाच्या टाटा कंपनीच्या 10 टायर कंटेनरमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मुंबई-आग्रा महामार्गावरील उमराणेजवळील उड्डाणपुलावर पोलिस शिपाई नीलेश सावकार आणि सचिन भामरे यांनी गुरुवारी (ता. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सापळा रचला. या वेळी संशयास्पद कंटेनर (HR 38 - W - 7236) आला असता शिताफीने तो रोखला. या कंटेनरची झडती घेतली असता यामध्ये राजनिवास कंपनीचा राज्यात विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर बंदी असलेला पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. कंटेनरचालक शोएबखान जैकम खान (वय 26, रा. जलालपूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Panmasala
नाशिक : कोरोना मदतीसाठी दहा लाखांची लाच

पोलिसांची धडक कारवाई

पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, कळवण उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवळ्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देवरे, हवालदार बच्छाव, पोलिस नाईक गांगुर्डे, योगेश क्षीरसागर, किरण पवार, भास्कर सोनवणे, सचिन भामरे, ज्योती गोसावी यांनी कारवाई केली.

Panmasala
वाहतूक नियम मोडला तर भरावा लागेल 25 पट अधिक दंड; नवीन नियमावली जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com