Female workers putting the extracted sludge into the tractor.
Female workers putting the extracted sludge into the tractor.esakal

Nashik News : रामतीर्थातून 5 टन कचरा संकलित; लक्ष्मण कुंडाची साफसफाई

नाशिक महापालिकेतर्फे गुरुवारी (ता.२८) रामतीर्थाची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेतून तब्बल साडेचार ते पाच टन गाळ व अन्य कचरा संकलित करण्यात आला.

Nashik News : नाशिक महापालिकेतर्फे गुरुवारी (ता.२८) रामतीर्थाची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेतून तब्बल साडेचार ते पाच टन गाळ व अन्य कचरा संकलित करण्यात आला. शुक्रवारी (ता. २९) लक्ष्मण कुंडाची स्वच्छता केली जाणार आहे.

पावसाळ्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे या वर्षी गोदापात्राची साफसफाई करण्यात आली नाही.(5 tonnes of garbage collected from Ramkund nashik news)

त्यामुळे भाविकांच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या रामतीर्थासह अन्य कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व अन्य कचरा साचला आहे. रामतीर्थ स्वच्छतेसाठी पूर्णपणे रिकामे करण्यात आल्यावर रामतीर्थ व त्याखालील दुतोंड्या मारुती कुंडांची स्वच्छता करण्यात आली. या वेळी रामतीर्थातून ३ ट्रॅक्टर म्हणजे साधारण दीड टन व हनुमान कुंडातून तेवढाच गाळ व अन्य कचरा काढण्यात आला.

गोदावरी संवर्धन समितीचे विजयकुमार मुंडे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. आवेश पलोड, उपअभियंते प्रकाश निकम आदींच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी तीन ट्रॅक्टर, तीन जेसीबींसह महापालिकेचे रामदास शिंदे, संजय जमदाडे, ज्ञानेश्‍वर वाघेरे, रामभाऊ कडाळे यांच्यासह वॉटरग्रेसचे तीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Female workers putting the extracted sludge into the tractor.
Nashik News : गतिमंद मुलगी पालकांच्या स्वाधीन

या वेळी मोठ्या प्रमाणावर शेवाळ आलेल्या पायऱ्यांचीही पावडरद्वारे स्वच्छता करण्यात आली. रामतीर्थ व त्याखालील दुतोंड्या मारुती कुंडाची स्वच्छता झालेली असलीतरी अद्यापही लक्ष्मण कुंडाची स्वच्छता बाकी आहे. सकाळी या भागात मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी होत असल्याने मोठी गर्दी असते. त्यामुळे उर्वरित मोहीम शुक्रवारी दुपारनंतर सुरू होणार असल्याची माहिती मनपाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिली.

संपूर्ण नदीपात्राची व्हावी स्वच्छता

भाविकांची वर्षभर मोठी वर्दळ असलेल्या रामतीर्थाची वर्षातून दोन ते तीन वेळेस स्वच्छता केली जाते, परंतु त्याखालील कुंडांचीही नियमित स्वच्छता व्हावी, अशी अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे. कारण दुतोंड्या मारुतीपासून ते थेट तपोवनाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या कन्नमवार पुलापर्यंत नदीपात्रात अद्यापही मोठ्या प्रमाणावर कचरा असून त्याचीही स्वच्छता व्हावी, अशी मागणी आहे.

Female workers putting the extracted sludge into the tractor.
Nashik News : जिल्ह्यात 3 तालुक्यांना मिळेना गटविकास अधिकारी; प्रशासनाची सुरू आहे कसरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com