Nashik Fraud Crime : चेक बाउन्स प्रकरणी 6 महिन्यांची शिक्षा

Crime News
Crime Newsesakal

Nashik News : कर्जाची थकबाकी भरण्यापोटी बँकेस दिलेला धनादेश वटला नाही. त्यामुळे कर्जदार याकुब युसूफ शाह (रा. बागवान पूरा) यांनी बँकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. (6 months sentence in check bounce case nashik fraud crime news)

याकुब युसूफ शाह यांनी फैज़ मर्कंटाइल बँकेकडुन १ लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, ते थकल्याने बँकेने वसुलीसाठी तगादा लावला. त्यावर शाह यांनी १ लाख ९ हजारांचा धनादेश कर्ज खात्यात टाकला होता. मात्र, तो वटला नाही.

त्यामुळे बँकेची फसवणूक झाल्याने बँकेने कर्जदारास थकबाकीची रक्कम भरण्याची नोटीस बजावली. तरीदेखील थकबाकीचा भरणा न केल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्य न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. पालीवाल यांनी शाह यास दोषी ठरवित ६ महिन्याचा कारावास आणि कर्जाच्या रकमेसह १ लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

दंड न भरल्यास आणखी ३ महिन्याचा कारावास भोगावा लागणार आहे. बँकेच्या वतीने ॲड. मोइन सय्यद आणि जूनेद पीरजाद यांनी काम पाहिले.

Crime News
Nashik Crime News: पंचवटीत किरकोळ वादातून हाणामारी अन् एकाची हत्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com