esakal | संचारबंदीत मिळेना दारू.. चोरट्यांची मजल पोहचली थेट एक्‍साइज कार्यालयावरच!
sakal

बोलून बातमी शोधा

daru chori.jpg

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशभरात लॉकडाउन सुरू आहे. या संचारबंदीच्या काळात मात्र तळीराम हे देशी-विदेशी दारू दुकानांवर डल्ला मारून दारूची सोय करत आहेत. पेठ रोडवरील राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय कार्यालय आहे. या ठिकाणाहून नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबारचा कारभार चालतो. भरारी पथकांमार्फत होणाऱ्या कारवाईत जप्त केलेला देशी, विदेशी, गावठी दारूचा मुद्देमाल हा येथील गुदामात जमा केला जातो. या ठिकाणी यापूर्वीही जप्त केलेली दारू चोरी गेल्याची पोलिस दप्तरी नोंदी आहेच.

संचारबंदीत मिळेना दारू.. चोरट्यांची मजल पोहचली थेट एक्‍साइज कार्यालयावरच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / म्हसरूळ : लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून दारूची दुकाने बंद असल्याने आपला कोरडा झालेला गळा ओला करण्यासाठी चोरट्यांनी आता राज्य उत्पादन शुल्क विभागालाच टार्गेट केले आहे. पेठ रोडवरील राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय कार्यालयावर चोरट्यांनी डल्ला मारत साडेतीन लाख रुपयांची जवळपास 68 बॉक्‍स विदेशी दारू लंपास केल्याची घटना रविवारी (ता. 12) उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अन्य सहा संशयित फरारी आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून दारूचे दोन बॉक्‍स हस्तगत करण्यात आले आहेत. 

साडेतीन लाख रुपयांची 68 बॉक्‍स विदेशी दारू लंपास, दोघे ताब्यात 
जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशभरात लॉकडाउन सुरू आहे. या संचारबंदीच्या काळात मात्र तळीराम हे देशी-विदेशी दारू दुकानांवर डल्ला मारून दारूची सोय करत आहेत. पेठ रोडवरील राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय कार्यालय आहे. या ठिकाणाहून नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबारचा कारभार चालतो. भरारी पथकांमार्फत होणाऱ्या कारवाईत जप्त केलेला देशी, विदेशी, गावठी दारूचा मुद्देमाल हा येथील गुदामात जमा केला जातो. या ठिकाणी यापूर्वीही जप्त केलेली दारू चोरी गेल्याची पोलिस दप्तरी नोंदी आहेच. परंतु संचारबंदीत शहरात अवैध दारूविक्री सुरू आहे. यात चोरट्यांनी तर अक्षरशः राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालयालाच टार्गेट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला व सध्या जामिनावर असलेला संशयित मंगलसिंग मिस्तरी शिंदे (वय 19, रा. मच्छी बाजार, पेठ रोड) व रामदास बन्सीलाल पाडेकर (वय 40, फुलेनगर, पाटाजवळ, पेठ रोड) यांनी व त्यांचे अन्य सहा साथीदारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात डल्ला मारत सुमारे तीन लाख 26 हजार चारशे रुपयांचे 68 बॉक्‍स चोरून नेले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मंगलसिंग शिंदे व रामदास पाडेकर यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन बॉक्‍स जप्त करण्यात आले आहे. पेठ रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाची संरक्षक भिंत तुटलेली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. सध्या सुरू असलेल्या संचारबंदी काळात या परिसरात शुकशुकाट असतो. त्यामुळे कार्यालय सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यवाही अपेक्षित आहे. 

हेही वाचा > धक्कादायक!...अन् 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:वरच झाडली गोळी...

नेमके किती बॉक्‍स चोरले यावर व्यक्‍त होतोय संशय 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गुदामातून चोरी झालेल्या दारूच्या बॉक्‍सच्या संख्येबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत दारूचे नेमके 68 बॉक्‍स चोरी गेले आहेत, की त्यापेक्षा कमी याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. कमी बॉक्‍स चोरीला गेले असले तरी जास्त बॉक्‍स चोरीला गेले आहे, असे सांगून कुणाची सोय केली जातेय की काय, अशीही चर्चा विभागात सुरू आहे. 

हेही वाचा >  BREAKING : मालेगावची परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष IAS अधिकाऱ्यांची नेमणूक..'हे' अधिकारी सांभाळणार जबाबदारी

loading image