CAT 2023 Exam: IIM मध्ये प्रवेशासाठी कॅट परीक्षेला 90 टक्के हजेरी

CAT Exam
CAT Examesakal

नाशिक : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या कॅट २०२३ या परीक्षेत नाशिकमधील परीक्षा केंद्रात चांगली उपस्थिती राहिली.

या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ९० टक्के उमेदवारांनी केंद्रावर उपस्थित राहत परीक्षा दिली. (90 percent attendance in CAT exam for admission in IIM nashik)

राष्ट्रीय स्तरावर आयआयएम लखनौ यांच्यातर्फे या वर्षीच्या कॅट परीक्षेचे आयोजन केले होते. त्यानुसार देशभरातील परीक्षा केंद्रांवर रविवारी कॅट २०२३ प्रवेश परीक्षा घेण्यात आली. वेगवेगळ्या सत्रांमध्ये संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) ही परीक्षा होती.

नाशिकमध्ये आडगाव येथील मेट भुजबळ नॉलेज सिटी या परीक्षा केंद्रावर एकूण तीन सत्रांमध्ये परीक्षा सुरळीत पार पडली. मार्गदर्शक सूचनानुसार परीक्षा केंद्रावर सर्व प्रकारची सावधगिरी बाळगताना गैरप्रकार टाळण्यात आले.

CAT Exam
Nashik Recruitment News: पोलीस पाटील आणि कोतवाल पदासाठी 10 डिसेंबरला परीक्षा

सर्व तिन्ही सत्रांमध्ये प्रत्येकी १४५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. यापैकी पहिल्या सत्रात १३८, दुसऱ्या सत्रात १२० आणि तिसऱ्या सत्रात १३२ विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थिती नोंदविली. एकूण प्रविष्ट ४३५ विद्यार्थ्यांपैकी ३९० विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. तर ४५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.

बुद्धिमत्तेच्या प्रश्नांनी लागली कसोटी

कॅट परीक्षेत विविध विषयांतील वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले. यापैकी बुद्धिमत्ता चाचणी विषयावरील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक राहिल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. तसेच निर्धारित वेळेत सर्व प्रश्न सोडविताना अनेक विद्यार्थ्यांची दमछाक झाल्याचे सांगण्यात आले.

CAT Exam
Nashik News: रानवडला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वाटप; दिल्लीच्या धार्मिक एकता ट्रस्टचे अभियान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com