Nashik Crime: खंबाळेवाडी येथे अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

खंबाळेवाडी (ता. इगतपुरी) येथे घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने ५० वर्षीय आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
rape news
rape newsesakal

नाशिक : खंबाळेवाडी (ता. इगतपुरी) येथे घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने ५० वर्षीय आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. (Accused sentenced to 10 years hard labor in Khambalewadi torture case Nashik Crime)

हिरामण रामचंद्र तिटकारे (५०, रा. खंबाळेवाडी, ता. इगतपुरी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना फेब्रुवारी २०२१ ते २७ मार्च २०२१ या दरम्यान घडली होती.

अल्पवयीन पीडित तिच्या राहत्या घरात झोपलेली असताना आरोपी हिरामण याने घरातील लाईट बंद करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. पीडितेचे आरडाओरडा केला असता आरोपीने पीडितेसह साक्षीदारांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती.

rape news
Nashik Bribe Crime: भूमी अभिलेखचा दप्तरबंद लाचलूचपतच्या जाळ्यात! 700 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

याप्रकरणी घोटी पोलीसात बलात्कार व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी गुन्ह्याचा तपास करीत दोषारोप पत्र दाखल केले होते.

सरकार पक्षातर्फे अभियोक्ता अनिल बागले यांनी कामकाज पाहिले. जिल्हा सत्र न्यायधीश खरात यांनी आरोपीला दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक पी.एस. दराडे यांनी काम पाहिले

rape news
Nashik Crime: पतीला मारण्यासाठी बिअर पाजून सर्पदंश! पत्नीचा साथीदारासह पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com