Achyut Godbole | मराठी ज्ञानभाषा होण्यासाठीच लेखन : अच्युत गोडबोले

Achyut Godbole
Achyut Godboleesakal

नाशिक : तुमच्याकडे काय आहे, यापेक्षा तुम्ही काय आहात हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे ‘बिझनेस’ करून ‘एम्पायर’ करावे असे मला कधीच वाटले नाही. तीन कोटींची नोकरी सोडून मी लिहीत राहिलो.

अर्थात, त्यासाठी सुरवातीपासून माझा ज्ञान शाखांकडे असलेला ओढा महत्त्वाचा होता, असे सांगत तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक-वक्ते अच्युत गोडबोले यांनी मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी मी लिहायला लागलो हे स्पष्ट केले. (Achyut Godbole statement Writing to make Marathi language of knowledge at Idols of Maharashtra awards 2022 nashik news)

भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे १९७२ मधील आयआयटीन्स केमिकल इंजिनिअर्स असलेले श्री. गोडबोले यांच्या लेखनाविषयीच्या प्रेरणा जाणून घेतल्या. ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, की पहिलीपासून आय. आय. टी. पर्यंत गणितामध्ये एकही गुण कमी मिळत नव्हता. केमिकल इंजिनिअरिंग केले आणि वाचनाची चर्चा होणाऱ्या समूहाची मला ओढ लागली.

मी वाचत राहिलो. लेखनाची रचना कशी आहे, हे समजावून घेत सोप्या भाषेत मराठीतून लेखन सुरू केले. मी एकही पुस्तक अनुवादित केलेले नाही. मी जो अभ्यास केलो, मी शिकलो ते आपल्या मराठी भाषेत लिहीत गेलो. मात्र ‘क्रेडिट’ देत गेलो आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकाचे ज्ञान मराठी वाचकांपर्यंत सोप्या भाषेतून पोचवले.

त्यामुळे माझी पुस्तके वाचली जातात. सात ते आठ पुस्तकांची मालिका असली, तरीही वाचकांची पसंती मिळते. याशिवाय ‘स्टोरी टेलिंग'च्या दहा ‘ऑडिओ' आहेत. ई-बुक्स उपलब्ध आहेत. मुळातच, ३२ वर्षे आय. टी., २३ वर्षे सीईओ म्हणून काम केल्यावरही लहानपणापासून लिहायची असलेली ऊर्जा गप्प बसू देत नव्हती.

Achyut Godbole
Nashik News: मध्यरात्री 3 वाहनांचा विचित्र अपघात; अपघातग्रस्त गाडीत कोट्यावधी रुपयांच्या नोटांची अफवा?

तीन वर्षांत ३५ पुस्तकांचे प्रकल्प

लेखनामध्ये सहलेखक असलेले १३ जण स्वतः लेखक झाले आहेत. त्यामध्ये अतुल कहाते, नीलांबरी जोशी, आसावरी निफाडकर, अमृता देशपांडे, दुष्यंत पाटील, अविनाश सरदेसाई, वैदही लिमये, माधुरी काजवे, अमिता धर्माधिकारी, विद्या प्रयाग, विनय दाबके, माधुरी ठाकूर देसाई, सुलभा पिशवीकर यांचा समावेश आहे. सायकॉलॉजी, मनात मन कल्लोळ, सायकोथेअरपी, डिप्रेशन अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

आतापर्यंत ४९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आगामी तीन वर्षांमध्ये ३५ पुस्तकांचे प्रकल्प हातात आहेत, असे सांगून श्री. गोडबोले म्हणाले, की बुद्धी, झोप आणि स्वप्न, ५० आयडीयाज इन सायकॉलॉजी (७ पुस्तकांची मालिका), इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, बायोलॉजी, सायन्स टेक्नॉलॉजी, आयडिया चेंज दि वर्ल्ड आदींचा त्यात समावेश आहे. मुळातच, पुस्तक लिहिताना पहिल्यांदा इतिहास दिला जातो.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Achyut Godbole
Nashik News : ZPच्या निधी नियोजनात अखेर आमदार कांदे यांना रस्त्यांसाठी निधी मिळाला!

मग चरित्रांची ‘थेअरी' गोष्टीसारखी करून लिहितो. ते वाचकांना खूप आवडते. माझे पुस्तक वाचले आणि नैराश्‍य गेले असे अनेकांनी भेटून सांगितले. शिवाय ‘मुसाफीर' वाचण्यातून सोळा जणांनी आत्महत्येपासून दूर राहणे पसंत केले. स्पर्धा परीक्षा देणारे तरुण आवर्जून माझी पुस्तके वाचतात. लेखनामागे कुतूहल महत्त्वाचे असते. ती माझ्या लेखनाची प्रेरणा आहे.

कोण म्हणून माझी ओळख?

अच्युत गोडबोले यांच्याकडे आय. टी. तज्ज्ञ, संगीताची आवड असलेले, गणिततज्ज्ञ, मानसतज्ज्ञ म्हणून पाहिले जाते. ते मात्र श्री. गोडबोले यांना मान्य नाही. मी अभ्यास करतो, मी शिकतो आणि शिकवतो, असे सांगणारे श्री. गोडबोले हे विवेकवादी, शांततावादी, महिला-पुरुष-जात-वर्ण न मानणारे आणि सगळ्यांना संधी मिळण्यासाठीचे समतावादी, मानवतावादीचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या बोलण्यासह प्रत्यक्ष कृतीतून जाणवत होते. ‘मला हौस नाही' ही त्यांची प्रतिक्रिया त्याचदृष्टीने लाखमोलाची आहे.

Achyut Godbole
Nashik News : पुरेशा सुविधा मिळत नसल्याने चापडगाव आश्रम शाळेचे विद्यार्थी उतरले रस्त्यावर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com