म्हाडाची घरे भाड्याने देत असाल तर सावधान! 309 घरमालकांना नोटीसा| MHADA | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mhada

म्हाडाची घरे भाड्याने देत असाल तर सावधान! | MHADA

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : म्हाडाची (MHADA) घरे मिळालेले लाभार्थी सध्या म्हाडाच्या घरात न राहता भाडेकरू घरात ठेवत आहे. या भाडेकरूकडून महिन्याकाठी भाडे वसूल करीत आहे. दरम्यान अशा ३०९ घरमालकांना (MHADA house renters) नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काय आहे प्रकरण...

लेखी पत्राद्वारे आदेश

म्हाडाची घरे मिळालेले लाभार्थी सध्या म्हाडाच्या घरात न राहता भाडेकरू घरात ठेवत आहे. या भाडेकरूकडून महिन्याकाठी भाडे वसूल करीत आहे. वास्तविक पाहता अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांनी येथे राहणे अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. यामुळे नाशिक विभाग म्हाडा सभापती शिवाजीराव ढवळे यांनी म्हाडाच्या लाभार्थ्यांना लेखी पत्राद्वारे विनंती आदेश काढले आहे. महिनाभरात भाडेकरूंनी घर खाली केले नाही तर घर मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ३०९ घरमालकांना आजपर्यंत आदेश काढण्यात आले आहेत. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर येथील म्हाडाच्या घरांची तपासणी सध्या सुरू आहे. म्हाडाची घरे भाड्याने देणाऱ्या लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हाडाचे सभापती शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले आहे. यासंदर्भात ३०९ घरमालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, भाडेकरू यांनी घरे खाली करण्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: ST Strike | नाशिकमध्ये 142 कर्मचाऱ्यांचे ST महामंडळाकडून निलंबन

म्हाडाच्या घरांची तपासणी सुरू

अचानक म्हाडाच्या इमारतींना भेटी दिल्या असता, अनेक लाभार्थी अल्प उत्पन्न गटातल्या असूनही ते म्हाडाची घरांमध्ये भाडेकरू ठेवत आहे. वास्तविक पाहता त्यांनी घरात राहणे अपेक्षित आहे. घरात भाडेकरू टाकलेल्या लाभार्थ्यांनी महिनाभरात भाडेकरूंना घर खाली करायला सांगावे अन्यथा लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल. - शिवाजीराव ढवळे, सभापती, म्हाडा

हेही वाचा: नाशिक जिल्हा बँकेत पोलिस आयुक्तांची ‘एन्ट्री’

loading image
go to top