Nashik Industrial News: जिल्ह्यात 79 नवीन उद्योगाची भर अन् वर्षभरात 8 अपघातांच्या घटना

पूर्वी औद्योगिक सुरक्षा विभागांसह कामगार व इतर विभाग कंपन्यांमध्ये भेट देवून पाहणी करून अहवाल सादर करण्यात येत होता.
Jindal Fire Accident
Jindal Fire Accident esakal

"सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या आस्थापनांत वीसपेक्षा जास्त कामगार आहेत, अशा आस्थापनांना औद्योगिक सुरक्षा विभागाकडून नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिकमध्ये एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत एकूण २०२६ आस्थापनाची नोंद करण्यात आली आहे. यात नवीन ७९ नवीन आस्थापनाची भर पडल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाच्या सहसंचालक अंजली आडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले."

- सतीश निकुंभ

(Addition of 79 new industries in district and 8 accidents in year Nashik Industrial News)

औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योगात विविध प्रकारचे अपघात होतात. त्यात कामाच्या ठिकाणी कामगारांना सुरक्षा साधन आहेत की नाही, विजेच्या धक्क्यापासून उपाययोजना, केमिकल हाताळताना सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देणे यासह विविध तरतुदी आहेत.

तरीही मोठ्या प्रमाणावर अपघात होताना पाहायला मिळते. पूर्वी औद्योगिक सुरक्षा विभागांसह कामगार व इतर विभाग कंपन्यांमध्ये भेट देवून पाहणी करून अहवाल सादर करण्यात येत होता.

त्याबाबत संबंधित आस्थापनांना सुधारणा करण्याबाबत सूचनाही देण्यात येत होत्या. परंतु, या गोष्टीला औद्योगिक संघटनानी प्रखर विरोध केल्याने गेल्या सात वर्षांत इन्स्पेक्टर राज बंद करण्यात आले आहे.

यामुळे अपघाताची संख्याही वाढत असल्याचे मत वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहे. शासनाने औद्योगिक विकास वाढवण्यासाठी तसेच विदेशी गुंतवणूक येण्याचा तसा निर्णय घेतलाचा डंका वाजवला जात आहे.

सातपूर, अंबड, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, इगतपुरी, विंचूर, येवला आदी ठिकाणी छोट्या, छोट्या औद्योगिक वसाहतीमधून ज्या आस्थापनात वीसपेक्षा जास्त कामगार आहेत, अशा आस्तापनाना औद्योगिक सुरक्षा कायद्यानुसार एप्रिल ते नोव्हेंबरअखेर एकूण २०२६ आस्थापनाची नोंदणी करण्यात आली आहे.

Jindal Fire Accident
Nashik Congress News: अद्यापही नैराश्यात अडकलेला पक्ष...

यात ७९ नवीन आस्थापनाचा या वर्षी समावेश झाला आहे. या काळात एकूण ८ मोठे अपघात झाले असून, यात १० कामगार मृत्यू पावले आहेत, तर काही अपंगत्व झाले आहेत.

यामध्ये मुंढेगाव येथील जिंदाल ग्रॅफाईट, अंबड येथील महिंद्रा इजिनिओ, टीडीके, सिन्नर जिंदाल पाइप आदी कंपन्यांचा समावेश आहे. या अपघातग्रस्त कामगार कुटुंबीयांना औद्योगिक सुरक्षा विभागामार्फत नुकसान भरपाई म्हणून २८ लाख ८७ हजार, तर सानुग्रह अनुदान म्हणून ५७ लाख ६५ हजार रूपयाची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

नाशिकमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांच्या बहुतेक कंपन्यांमध्ये प्रेस मशिनचा अधिक वापर होतो. यात मोठ्या प्रमाणावर अपघात होताना पाहायला मिळते आहे. यात अपंगत्व झाल्याचे उदाहरण आहे.

अलीकडे महिला कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, पुरुषाबरोबर महिला कामगारांचे बोट तुटल्याने अपंगत्व झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. याबाबत औद्योगिक सुरक्षा विभागात मोठ्या प्रमाणावर मंथन केले जात आहे.

Jindal Fire Accident
YCMOU News: ‘मुक्त’ च्‍या अभ्यासक्रमात आबा महाजनांची कविता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com