

Digital Deadlock: Maha e-Seva Centers Paralyzed as Government Portal Crashes
Sakal
सटाणा : दहावीचा निकाल आज शुक्रवारी जाहीर होत असताना विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मात्र विविध दाखल्यांच्या प्रतीक्षेत अडकून पडल्याचे चित्र समोर आले आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील महा ई-सेवा केंद्रांचे कामकाज जवळपास दहा दिवसांपासून विस्कळीत झाले असून, हजारो विद्यार्थ्यांचे उत्पन्न, जाती, रहिवासी, अधिवास, नॉन-क्रीमीलेअर आणि ईडब्ल्यूएस दाखल्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. परिणामी प्रवेशप्रक्रियेच्या तोंडावर विद्यार्थ्यांसह पालकांची अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे.