Agriculture Courses Admission : कृषी अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत; जाणुन घ्या वेळापत्रक

admission to agricultural courses
admission to agricultural coursesesakal

Agriculture Courses Admission : इयत्ता बारावीनंतर कृषी शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण व एमएचटी-सीईटी परीक्षेतून पात्रता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

नोंदणीदरम्‍यान विद्यार्थ्यांना सर्व आवश्‍यक कागदपत्रांची स्‍कॅन कॉपी अपलोड करावी लागणार आहे. (agriculture courses degree first year admission schedule released nashik news)

त्‍यामुळे अर्ज भरण्यापूर्वी आवश्‍यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याच्‍या सूचना जारी केलेल्‍या आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी आहे प्रवेश प्रक्रिया

राहुरी (जि.नगर) येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला (जि.अकोला) येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रत्‍नागिरीतील दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठात उपलब्‍ध पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.

यामध्ये बी.एस्सी (ॲग्री), बी.एस्सी.(हॉर्टिकल्चर), बी.एस्सी (फॉरेस्‍ट्री), बी.एफ. एस्सी (फिशरी सायन्‍स), बी.टेक. (ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग), बी.टेक. (फूड टेक्‍नॉलॉजी), बी.एस्सी (कम्‍युनिटी सायन्‍स), बी.टेक. (बायोटेक्‍नॉलॉजी), बी.एस्सी (ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

आकडे बोलतात..

* शासकीय अनुदानित महाविद्यालयात उपलब्‍ध जागा----३ हजार ३६२

* विनाअनुदानित महाविद्यालयात उपलब्‍ध जागा-----१२ हजार ६९०

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

admission to agricultural courses
Vocational Courses Admission : विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला या तारखेपासुन सुरुवात

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ९ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत विद्यार्थ्यांतून गुणवत्ता यादी तयार करून त्‍याआधारे प्रवेश दिले जातील. त्‍यासाठी तीन प्रवेश फेऱ्या राबविल्‍या जाणार आहेत.

दरम्‍यान ऑगस्‍टपर्यंत चालणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेत प्रवेशाच्‍या एकूण तीन फेऱ्या पार पडणार आहेत. त्‍यानंतरही रिक्‍त राहिलेल्‍या जागांवर अंतिम टप्यांत प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार ९ जुलैपर्यंत नोंदणीची मुदत दिलेली असून, नोंदणीकृत विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेत सहभागी होता येईल.

प्रवेशाचे वेळापत्रक असे-

विद्यार्थ्यांना नोंदणीची मुदत--------९ जुलैपर्यंत

प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्धी--------१३ जुलै (सायं.साडे पाचला)

admission to agricultural courses
Free Courses : हे फ्री ऑनलाईन कम्प्युटर कोर्सेस ठरतील फायद्याचे, लगेच मिळेल जॉब!

हरकती नोंदविण्याची मुदत----------१४ ते १६ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी------२० जुलै

पहिली निवड यादी प्रसिद्धी---------२२ जुलै

विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत----------२३ ते २५ जुलै

दुसऱ्या निवड यादीची प्रसिद्धी-------२७ जुलै

विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत----------२८ ते ३० जुलै

तिसरी निवड यादीची प्रसिद्धी------२ ऑगस्‍ट

विद्यार्थ्यांना प्रवेशाची मुदत---------३ ते ५ ऑगस्‍ट

admission to agricultural courses
Vocational courses करायचे? खासगी विद्यापीठात प्रवेशासाठी शेवटची संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com