मुंबईच्या धर्तीवर नाशिक महापालिकेच्या सर्व शाळा होणार डिजिटल

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नाशिक महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट होणार आहे.
Digital-School
Digital-Schoolesakal

नाशिक : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट होणार आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी यासाठी पुढाकार घेत विद्यार्थ्यांसाठी ‘एक ड्रेस कोड', शाळेला भेटी देण्यासाठी सरप्राईज व्हिजिट पथकांनंतर प्रत्येक शाळेत संगणक कक्षासह डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्डासह अनेक सुविधांसह शाळा स्मार्ट करण्याकडे लक्ष दिले आहे.

गोदावरी प्रदूषण, महापालिका आर्थिक सक्षमीकरणानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी, शाळांचा दर्जा, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामकाजात गतीमानता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तिन्ही विभागातील कर्मचाऱ्यांच्या याद्या मागविल्या. पुढच्या टप्प्यात महापालिकेच्या शाळांचे कामकाज अधिक सक्षम करण्यावर आयुक्त भर देणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सगळ्या शाळांत स्मार्ट कामकाज सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी लक्ष घातले आहे. महापालिकेच्या शाळांतील संगणकीकरण, इमारतीची डागडुजी, इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, सीसीटीव्ही आदी सुविधा देत महापालिकेच्या शाळांना स्मार्ट करण्याचे नियोजन आहे. त्याचा आढावा घेतला जात आहे. महापालिकेच्या ८८ प्राथमिक १३ माध्यमिक शाळांमध्ये कामकाजात व शैक्षणिक दर्जात सुधारणा होण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी पुढाकार घेत कामकाजाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळेच महापालिका शाळांचे कामकाज अधिक गतिमान होणार आहे.

Digital-School
सापडलेला धनादेश परत करत शिक्षकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन

सुरक्षेची काळजी

प्रत्येक शाळांतील एक संगणक कक्ष असेल. त्यात डिजिटल व इंटरॅक्टिव्ह फलक असतील. या सगळ्या सुविधा देण्यापूर्वी महापालिकेला शाळांच्या इमारतीच्या सुरक्षेवर लक्ष द्यावे लागणार आहे. नाशिकला अनेक शाळांमध्ये साहित्य चोरीला जाते. नाशिक रोड विभागात गोरेवाडी शाळेत संगणकासह अनेक साहित्याची चोरी झाली असून, नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. रात्रीची सुरक्षा होत नसल्याने आधी महापालिकेला सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार आहे.

Digital-School
नाशिक : बागलाण तालुक्यात 47 हजार पुस्तकांचे वाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com