esakal | होर्डिंगवरील 'पोस्टर' व 'बॉय'ला पोलिसांकडून तंबी! झेरॉक्स नगरसेवकांची पोलिस ठाण्यात हजेरी

बोलून बातमी शोधा

poster boy 123.jpg

सिडको परिसरातील होर्डिंगचा विषय भाजपच्या एका नगरसेवकाने थेट भुजबळ फार्महाउसवर नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे होर्डिंगवॉर शिवजयंतीपर्यंत चालणार यात शंका नाही.

होर्डिंगवरील 'पोस्टर' व 'बॉय'ला पोलिसांकडून तंबी! झेरॉक्स नगरसेवकांची पोलिस ठाण्यात हजेरी
sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सिडको परिसरात विनापरवानगी लावलेल्या होर्डिंगचा विषय सोमवारी (ता. ८) चांगलाच चर्चिला गेला. पोलिस प्रशासनाने ‘सकाळ’चे वृत्त चांगलेच गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

भाजप तसेच शिवसेनेच्या झेरॉक्स नगरसेवकांची पोलिस ठाण्यात हजेरी
सोमवारी अंबड पोलिस ठाण्यातर्फे होर्डिंगवर छायाचित्र असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या ‘पोस्टर्स बॉय’चे होर्डिंग काढून टाकण्याचे पत्र सिडको महापालिका विभागीय कार्यालयाला देण्यात आले. सिडको परिसरात विद्रूपीकरण करणाऱ्या होर्डिंग्जचे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांकडून होर्डिंगवर लागलेल्या छायाचित्रावरून लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात आली. यामध्ये अनेक लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त विजय खरात यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार अंबड पोलिसांनी हद्दीत असलेल्या सर्व होर्डिंग व त्यावरील संशयितांच्या छायाचित्राची तपासणी केली. यावरून भाजप तसेच शिवसेनेच्या झेरॉक्स नगरसेवकांनी अंबड पोलिस ठाण्यात हजेरी लावली. हा विषय दिवसभर सिडकोमध्ये चर्चेचा ठरला. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

होर्डिंगचा विषय भुजबळ फार्मवर 
सिडको परिसरातील होर्डिंगचा विषय भाजपच्या एका नगरसेवकाने थेट भुजबळ फार्महाउसवर नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे होर्डिंगवार शिवजयंतीपर्यंत चालणार यात शंका नाही.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच