esakal | VIDEO : शेतकऱ्यांनो..आधार कार्ड नाही? चिंता करू नका.. हे बघा.. 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer aadhar.jpg

सध्या दोन लाखाच्या आत व दोन लाखाच्या पुढे किती शेतकरी कर्जदार आहे. यांची वर्गवारी केली जात असून नाशिक धुळे, नगर, जळगाव, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये चारशे ऑडिटर कामकाज करीत आहे. आधार कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना आधार केंद्रावर प्राधान्याने आधार कार्ड काढून देण्याचे निर्देश आधार केंद्र संचालकांना दिलेले असून कोणाला काहीही अडचण असल्यास याठिकाणी संपर्क साधावा.

VIDEO : शेतकऱ्यांनो..आधार कार्ड नाही? चिंता करू नका.. हे बघा.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ज्या शेतकऱ्यांनी सातबाराला आधार लिंक केले नसतील त्यांनी सात तारखेपर्यंत आधार लिंक करावे तसेच ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड काढले नसतील त्यांना शासकीय यंत्रणा प्राधान्याने आधार कार्ड काढून देण्यास मदत करणार असून सात तारखेच्या आत शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन विभागीय महसूल उपयुक्त दिलीप स्वामी यांनी केले आहे.

आधार कार्ड नसलेल्यांना प्राधान्याने काढून देणार - महसूल उपा.दिलीप स्वामी 

 नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि नगर यांचा कारभार असणाऱ्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात पाचही जिल्ह्यांमधील यंत्रणेला शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक करण्याविषयी निर्देशित केले जात आहे. उत्तर महाराष्ट्रात चारशे ऑडिटर नेमणूक केलेले असून दोन लाखाच्या खाली व दोन लाखाच्यावर असणाऱ्या कर्ज खात्यांचे विभागवार नियोजन केले जात आहे. जवळपास वीस टक्के कामकाज पूर्ण झाले असून शासनाने दिलेल्या वेळेच्या आत कामकाज पूर्ण करणार असल्याचे नियोजन विभागीय महसूल आयुक्त कार्यालयातून होत आहे. व्‍यापारीबँकेत खाते असणार्‍या खातेदारांचे मोठ्याप्रमाणावर आधार कार्ड लिंक आहे. ज्या गावांमध्ये नेटची सुविधा उपलब्ध नसेल अथवा अडथळा येत असतील अशा गावात शासकीय यंत्रणा मदतीसाठी पाठवली गेलेली आहे. यासाठी सहकार वित्त ,महसूल ,तलाठी, ग्रामसेवक, आधार केंद्र संचालक आणि शेतकऱ्यांशी संबंधित असणाऱ्या इतर विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या संबंधित अकरा व बारा तारखेला विभागीय महसूल आयुक्त आढावा घेणार आहेत. कागदपत्र पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना जास्त त्रास होऊ नये हा शासनाचा उद्देश असून सबंध सरकारी यंत्रणांना यासंबंधी शेतकऱ्यांची आधार कार्ड लिंक करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत सात तारखेपर्यंत जे शेतकरी आधार कार्ड लिंक करणार नाही त्यांची वेगळी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे असेही महसूल कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे .

हेही वाचा > दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..

काहीही अडचण असल्यास संपर्क साधा.. 
सध्या दोन लाखाच्या आत व दोन लाखाच्या पुढे किती शेतकरी कर्जदार आहे. यांची वर्गवारी केली जात असून नाशिक धुळे, नगर, जळगाव, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये चारशे ऑडिटर कामकाज करीत आहे. आधार कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना आधार केंद्रावर प्राधान्याने आधार कार्ड काढून देण्याचे निर्देश आधार केंद्र संचालकांना दिलेले असून कोणाला काहीही अडचण असल्यास संबंधित शासकीय यंत्रणेशी अथवा महसूल आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. -दिलीप स्वामी, महसूल उपायुक्त (नाशिक विभाग)

हेही वाचा > भयावह! बाईकवरून सुसाट जाताना..अचानक बाजूच्या धावत्या कारचा दरवाजा उघडला...

loading image