अतिरिक्त सोडा पण ठरलेलं वेतनही रखडलयं! आशा सेविका आक्रमक

मागण्या मान्य न झाल्यास कोरोनाची कामे थांबविणार असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिरिक्त सोडा पण ठरलेलं वेतनही रखडलयं! आशा सेविका आक्रमक

नाशिक : आशासेविका व गटप्रवर्तक यांच्या प्रमुख मागण्यांकडे शासन दुर्लक्षित करत असल्याने १५ जूनला एक दिवसीय लाक्षणिक संप करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे देण्यात आला आहे. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास कोरोनाची(Corona) कामे थांबविणार असल्याचेही समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्त यांना निवेदन देण्यात आलेले आहे.(Aasha workers on strike)

कामाचा मोबदलादेखील मिळत नाही

कोरोना महामारी(Corona pandemic) सुरू झाल्यापासून आठ तासाहून अधिक वेळ काम करून घेतले जात आहे. त्याचा मोबदलादेखील दिला जात नाही. सर्व आशासेविका यांचे शासकीय सेवेत समायोजन करणे, त्यांना कोरोना कामाचा मोबदला देण्यात यावा, आशा व गटप्रवर्तक यांच्या वेतनात अनुक्रमे दोन व तीन हजार रुपये वाढ केलेली असताना नोव्हेंबरपासून अनेक सेविकांना ही अतिरिक्त वाढ मिळालेली नाही. ती व रखडलेले सर्व वेतन द्यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे आशासेविका व गटप्रवर्तक यांना ५० लाखाचा विमा(Insurance) कवच द्यावे, यासह प्रमुख मागण्यासाठी १५ जूनला लाक्षणिक संप केला जाणार आहे. संपात राज्यातील ७५ हजार आशा व ४ हजार गटप्रवर्तक सहभागी होणार आहे. निवेदनावर एम. ए. पाटील, सुमन पुजारी, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे, नेत्रदिपा पाटील, राजू देसले, रंजना गारोळे, स्वाती धायगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अतिरिक्त सोडा पण ठरलेलं वेतनही रखडलयं! आशा सेविका आक्रमक
नाशिक लॉकडाऊन शिथिल : बाजार समित्या, औद्योगिक क्षेत्राला दिलासा
अतिरिक्त सोडा पण ठरलेलं वेतनही रखडलयं! आशा सेविका आक्रमक
पोलिसमित्रांविरुद्ध नागरिकांचा तक्रारीचा पाढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com