esakal | भाविकांविना प्रतिपंढरपूर समजले जाणारे कोटमगाव आषाढीला सुनेसुने!
sakal

बोलून बातमी शोधा

kotamgaon

भाविकांविना प्रतिपंढरपूर समजले जाणारे कोटमगाव आषाढीला सुनेसुने!

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : लाखभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी… सुमारे शंभर ते दीडशे दिंड्यांचे आगमन आणि भव्य-दिव्य भरलेली यात्रा… अशा वातावरणात प्रतिपंढरपूर म्हणजेच कोटमगाव विठ्ठलाची येथे भरणारी यात्रा आज सुनीसुनी दिसली. आषाढी एकादशी निमित्त येथे आज मंदिर बंद होते मात्र भाविकांनी येऊन दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षी लाखात असणारी गर्दी मात्र हजाराच्या आसपासच मर्यादित राहिली. (ashadhi-ekadashi-celebrations-canceled-at-vitthal-mandir-kotamgaon-yeola)

परमेश्वरावरील नितांत श्रद्धा असली की मंदिर उघडे पाहिजेच असे काही नाही. याचा प्रत्यय आज प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कोटमगाव विठ्ठलाचे येथे आला. येथील श्री विठ्ठल मंदिर सलग दूसऱ्या वर्षी करोनामुळे आषाढी एकादशीलाही बंद राहिले. येथील यात्रोत्सव देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो रुपयाची उलाढाल ठप्प झाली.


ऐतिहासिक धार्मिक पार्श्‍वभूमीमुळे येथे आषाढी एकादशीला दरवर्षी यात्रोत्सव भरतो तर नाशिक, नगर, औरंगाबाद येथून शेकडो दिंड्यांतून लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येथे येत असतात. यंदा मात्र मंदिराला कुलूप असल्याने आलेल्या मोजक्या भाविकांनी बाहेरुनच दर्शन घेतले. आज पहाटे ३ वाजता ग्रामस्थ राजेंद्र काकळीज व अरूण धनगे यांनी सपत्नीक विधीवत विठ्ठलाची पुजा केली. या प्रसंगी अध्यक्ष गणपत ढमाले, पंढरीनाथ पाटील,सोपान ढमाले, तुळशीराम कोटमे,भागवत मोरे, सरपंच सोनाली कोटमे, अंजना नरवडे, संजय नरवडे, रामेश्‍वर तांदळे, भगवान तांदळे, भूषण बिलोरे, ग्रामसेवक सुजाता परदेशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: मालेगावात सलग तीन दिवस होणार पाणीपुरवठा

दिवसभरात शहर व परिसरातील काही भाविक दर्शनासाठी येत होते.मात्र येथील स्थानिक प्रशासनाने मंदिर कुलूप बंद करुन भाविकांनी गर्दी करु नये,असे आवाहन केल्याने भाविक अंतराअंतराने बाहेरुनच दर्शन घेताना दिसले. आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी यात्रा यंदाही कोरोनामुळे रद्द करण्याचा व मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येथील यात्रोत्सवात नारळ, पुजा साहित्य, प्रसाद, मिठाई आदींची मोठी रेलचेल असते.यंदा येथे एकही दुकान दिसले नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले असून ग्रामपंचायतीस मिळणार्‍या उत्पन्नातही सलग दुसर्‍या वर्षी मोठी घट येणार आहे."आज पहाटे विधिवत महापूजा करण्यात आली तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले. विठूमाऊली भेटीसाठी जात असताना त्यांनी येथे मुक्काम केला होता.आषाढी एकादशीला दहीहंडी फोडली जाते, तिचा पहिला मान कोटमगावला असून त्यानंतर पंढरपूर येथे दहीहंडी फोडली जाते. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला प्रतिपंढरपूर म्हटले जाते. मोठी महती असूनही आज मंदिर बंद ठेवावे लागले."
- सोनाली कोटमे, सरपंच, कोटमगाव विठठलाचे


(ashadhi-ekadashi-celebrations-canceled-at-vitthal-mandir-kotamgaon-yeola)

हेही वाचा: नाशिकमध्ये दिवाणी न्यायालयात ‘व्हर्च्युअल’ कामकाज

loading image