Nashik Crime : 'गुंतवणुकीसाठी काळ शुभ आहे' म्हणत ज्योतिषाने व्यावसायिकाला पाऊण कोटींना लुटले!

Nashik Astrologer Accused in ₹75 Lakh Share Market Fraud : ‘तुमचा काळ आर्थिक गुंतवणुकीसाठी शुभ’ असल्याचे सांगत, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या संशयित ज्योतिष्याने व्यावसायिकाला तब्बल पाऊणकोटींना गंडा घातला.
Astrologer Fraud Nashik

Astrologer Fraud Nashik

sakal 

Updated on

नाशिक: शरणपूर रोड परिसरात असलेल्या अंजनीय ज्योतिष कार्यालयात येणाऱ्या ‘तुमचा काळ आर्थिक गुंतवणुकीसाठी शुभ’ असल्याचे सांगत, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या संशयित ज्योतिष्याने व्यावसायिकाला तब्बल पाऊणकोटींना गंडा घातला. त्यानंतर कार्यालय बंद करून संशयित पसार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच शहर सायबर पोलिसांनी ज्योतिष्याचे कार्यालय सील करीत कसून तपास सुरू केला आहे. सचिन देशमुख (रा. एचडीएफसी बँकेजवळ, शरणपूर रोड) असे संशयिताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com