VIDEO : इटलीस्थित निफाडचा तरुण म्हणतोय..‘मला काही होत नाही..काही झालं नाही’ असे म्हणू नका!

abhishek derle from italy.jpg
abhishek derle from italy.jpg
Updated on

नाशिक : राज्यात शासनाकडून कर्फ्यू जाहीर केला तरी अनेक नागरिक घराबाहेर आहेत. सूचनांचे पालन करीत नाहीत. ‘मला काही होत नाही, मला काही झालं नाही’, असे म्हणू नका. तर गर्दीत जाणे टाळा आणि कोरोनाचे वाहक बनू नका असे कळकळीचे आवाहन मूळच्या निफाड तालुक्यातील व सध्या इटलीस्थित अभिषेक डेरले या युवकाने केले आहे.

नेमका काय म्हणाला अभिषेक...

भारतातील जनतेने केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक सूचनेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, गर्दीत जाणे टाळायला हवे. कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत असल्यास समोरच्या व्यक्तीपासून सहा ते सात फुटाचे अंतर राखावे आणि आपले हात खिशातच ठेवावेत. कारण व्हायरसचा प्रसार करण्यात हात हेच प्रसारमाध्यम असल्याचे सांगून प्रत्येकाने काळजी घ्यावी,असे आवाहन अभिषेक डेरले याने केले आहे.मागील काही आठवड्यांपासून मी इटलीमधील कोरोना व्हायरसची स्थिती बघत आलो आहे. इटलीमधील केसेस दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याचे मूळ कारण म्हणजे जनतेने केलेला निष्काळजीपणा. कोरोना व्हायरस स्टेज वन आणि स्टेज टूमध्ये असताना इटालियन सरकारने जनतेला गर्दीमध्ये जाणे टाळा अशा सूचना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम पहावयास मिळत आहेत. इटलीप्रमाणे भारत आज स्टेज टू असून, जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करून गर्दीत जाणे टाळले पाहिजे.

अभिषेकची चिंता सोशल मीडियावरून

अभिषेक हा निफाड येथील रहिवाशी असून, सध्या तो इटलीतील तुरीन प्रांतात स्थायिक झालेला आहे. तेथे तो ‘मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी’ या विषयावर पीएच.डी. करीत आहे. इटलीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला असून, सद्यस्थिती त्याने जवळून अनुभवलेली आहे. कोरोनाची पाळेमुळे हळूहळू सर्वत्र पसरत असून, त्याची झळ भारतालाही बसू लागली आहे. सध्या भारत कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर असल्याने अभिषेकने सोशल मीडियाच्या माध्यमावर एक व्हिडीओ बनवून चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com