B Pharmacy Admission : ‘बी.फार्मसी’नोंदणीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ; जाणून घ्या प्रवेश वेळापत्रक

B Pharmacy registration Extension of deadline till 31 july nashik news
B Pharmacy registration Extension of deadline till 31 july nashik news esakal

B Pharmacy Admission : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया प्रवेश फेऱ्यांच्या स्‍तरापर्यंत पोहोचलेली असताना औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमांची नोंदणी सुरु होती. त्‍यातच बी. फार्मसीच्‍या नोंदणीला पुन्‍हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार पात्र विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी सोमवार (ता.३१) पर्यंत वाढीव मुदत असेल. (B Pharmacy registration Extension of deadline till 31 july nashik news )

डी. फार्मसीच्‍या नोंदणीची मुदत संपली असून, कॅप राउंडची प्रक्रिया सुरू होणार आहे.

औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम बी. फार्मसीच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जात आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिले जातो. आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी पुन्‍हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.

सुधारित प्रवेश वेळापत्रकानुसार सोमवार (ता.३१) पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी यापैकी कुठल्‍याही एका पद्धतीद्वारे कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी १ ऑगस्‍टपर्यंत मुदत असेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

B Pharmacy registration Extension of deadline till 31 july nashik news
Career Selection : पालकांनो मुलांनाच ठरवू द्या भविष्याची दिशा; अन्यथा होईल दुर्दशा...!

३ ऑगस्‍टला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, तक्रार किंवा हरकती नोंदविण्यासाठी ४ ते ६ ऑगस्‍ट अशी मुदत असेल. ८ ऑगस्‍टला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

फार्मसी अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक असे-

बी. फार्मसी डी. फार्मसी.

* पहिल्या कॅप राउंडची नोंदणी ९ ते ११ ऑगस्‍ट १ ते ३ ऑगस्‍ट

* निवड यादीची प्रसिद्धी १४ ऑगस्‍ट ५ ऑगस्‍ट

* प्रवेश निश्‍चितीची मुदत १७ ते १९ ऑगस्‍ट ६ ते ९ ऑगस्‍ट

* दुसऱ्या कॅप राउंडची नोंदणी २१ ते २३ ऑगस्‍ट १२ ते १६ ऑगस्‍ट

* निवड यादीची प्रसिद्धी २५ ऑगस्‍ट १८ ऑगस्‍ट

* प्रवेश निश्‍चितीची मुदत २६ ते २८ ऑगस्‍ट १९ ते २२ ऑगस्‍ट

B Pharmacy registration Extension of deadline till 31 july nashik news
Career Selection : असे निवडा करिअर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com