esakal | "कोणतीही तपासणी करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या" बॅचलर तरुणांची विनवणी
sakal

बोलून बातमी शोधा

young people.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांमध्ये काम करीत असलेले शिकाऊ, ठेकेदार, कंत्राटी, रोजंदारी कामगार तसेच शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा उठला आहे. तर काही जण गावाकडे निघून गेल्यामुळे या तरूण वर्गाचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. याबाबत प्रशासनाकडे "काय चौकशी अथवा वैद्यकीय तपासणी करायची ती करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या" अशी विनवणी हे तरुण करीत आहेत.

"कोणतीही तपासणी करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या" बॅचलर तरुणांची विनवणी

sakal_logo
By
सतिश निकुंभ: सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान मोदींनी (ता.२५) देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. यानंतर लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्याचा दावा प्रशासन करत असले तरी नाशिकच्या सातपूर-अंबडसह जिल्यातील औद्योगिक वसाहतीत काम करणारे कंत्राटी कामगार तसेच विविध जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या बॅचलर तरूणाचे खाण्यापिण्याचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे "कोणतीही तपासणी करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या" अशी विनवणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

भितीने पोटात गोळा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांमध्ये काम करीत असलेले शिकाऊ, ठेकेदार, कंत्राटी, रोजंदारी कामगार तसेच शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा उठला आहे  तसेच या बंदमुळे मेस व स्वयंपाक करणाऱ्या महिलांनीही आर्थिक परीस्थितीचा विचार करून डबे बंद केले आहेत तर काही जण गावाकडे निघून गेल्यामुळे या तरूण वर्गाचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. याबाबत प्रशासनाने "काय चौकशी अथवा वैद्यकीय तपासणी करायची ती करा पण आम्हाला गावाकडे जाऊ द्या अशी विनवणी करताना पाहायला मिळत आहे.

"माझ्यासारखे हजारो तरूण अशा गंभीर समस्यात अडकले आहेत"

"मी बारामतीचा निवासी असून सिएटमध्ये कामाला होतो. पण कोरोनामुळे कंपनीच बंद झाली. त्यामुळे माझ्या रूममधील पार्टनर स्थानिक जिल्हाचे असल्याने ते गावाकडे निघून गेले.. मला ही जायचे आहे. माझ्यासारखे हजारो तरूण अशा गंभीर समस्यात अडकले आहेत. प्रशासनाने सहकार्य करावे" -  मनोज कोकरे सिएट कंत्राटी कामगार  

"मी शिंदखेडा धुळे जिल्ह्यातील असून दोन महिन्यापूर्वी शिक्षणा निमीत्ताने नाशिकला आलो. शिक्षणबरोबर मिळेल ते कामही करत होतो पण अचानक कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने मी अडकून पडलो, बाहेर निघालो तर पोलिस दंडे मारतात. त्यामुळे आम्ही सांगायचं कुणाला हाच खरा प्रश्न आहे प्रशासनाने आमच्यासारख्या तरूणांना गावाकडे जाण्यासाठी परवानगी द्यावी" -हेमंत पाटील अशोक नगर विद्यार्थी 

हेही वाचा > पोल्ट्री व्यवसायाला जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांचा दिलासा...लॉकडाऊनमध्येही मिळणार चिकन अन् अंडी!

नागरिकांचा जीव कासावीस

जस जसे लॉकडाऊनचे दिवस वाढत आहे. तसतशी हातावरील पोट भरणारे तसेच भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक कोंडी वाढत आहे. शहरात राहायचे म्हणजे घरातुन बाहेर पडताच पैसा लागतो. आर्थिक नुकसान पाहता प्रशासन गावाकडे जाऊ देत नाही त्यामुळे अशा नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे.

हेही वाचा >"घरात कंटाळा येतोय.. विनाकारण घराबाहेर पडायचयं? तर घ्या मग पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा!"....सोशल मिडीयावर व्हायरल​

loading image