Recreation Centre : ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी शिंदे गट सरसावला

Recreation Centre : ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी शिंदे गट सरसावला
esakal

नाशिक : महापालिकेच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजना तसेच महिला (Women) बालकल्याणसाठी निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. (Balasahebs Shiv Sena District Chief insisted Municipal Commissioner Create recreation center for senior citizens nashik news)

मात्र, अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली जात असली तरी प्रत्यक्षात दोन निधी अन्यत्र वळवून या विभागांवर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त करत बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तयार करावी, अशी आग्रही मागणी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली.

समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत विकास पोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अंदाजपत्रकाच्या नियमानुसार २० टक्के राखीव निधी ठेवणे बंधनकारक आहे. दलित वस्त्यांचा विकास, महिला बालकल्याण, विविध प्रशिक्षणासाठी असे प्रत्येकी पाच टक्के निधी राखीव ठेवावा लागतो. परंतु गेली अनेक वर्ष निधीची पळवापळवी होते.

त्यामुळे चारही क्षेत्र हे मागासलेली राहिले आहे. शहरात १५९ वस्त्या आहेत, या वस्त्यांमधील ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण झाली पाहिजेत. या विरंगुळा केंद्रात तसेच शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकच्या ठिकाणी केवळ ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक बाकडी बसवली पाहिजेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Recreation Centre : ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी शिंदे गट सरसावला
Nashik News : बागलाण तालुक्यातील विकास कामांसाठी 22 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर

तसेच, लहान मुलांसाठी चांगली खेळणी, व्यायामशाळा असतील तर व्यायाम साहित्य किंवा ग्रीन जिम असाव्यात. त्याचप्रमाणे चांगली सुलभ शौचालय, सर्वात महत्त्वाचे फक्त महिलांसाठी राखीव असावे. शहरामध्ये ३४६ अंगणवाड्या आहेत, दुर्दैवाने अंगणवाड्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक अंगणवाडीला स्वतची इमारतच नाही.

अंदाजपत्रकात अंगणवाड्यांच्या संदर्भात सकारात्मक धोरण असावे. उद्यानांची देखभाल करताना मनपाला तारेवरची कसरत करावी लागते. म्हणून प्रत्येक विभागात क्रीडांगणे निर्माण झाली पाहिजेत.सुदृढ नाशिककर घडवायचा असेल तर क्रीडांगणाची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र शासनाने राखीव ठेवलेला हा २० टक्के निधी हा त्या त्या राखीव क्षेत्रासाठीच वापरण्यासाठी काहीकाळ मर्यादा निश्चित केली पाहिजे. त्यानुसारच तो निधी संबंधित विभागासाठी खर्च होणे कामी पुढील नमून तक्त्यातील रकमेचा अंदाज पत्रकात समावेश करावा, अशी मागणी श्री. बोरस्ते यांनी निवेदनात केली आहे.

Recreation Centre : ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी शिंदे गट सरसावला
Devendra Fadnavis : मी यांच्या बापालाही घाबरत नाही; फडणवीसांची जीभ घसरली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com