
सातपूर (नाशिक) : भारतीयांच्या दृष्टीने धार्मिक ठिकाणे श्रद्धेची आहे. अशा ठिकाणचे अन्न शुद्ध अन् पवित्र मानले जाते. धार्मिक संस्थांच्या प्रसादालय, लंगर, भंडाऱ्यातील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी ‘इट राईट इंडिया’ उपक्रमांतर्गत भोग प्रमाणिकरण केले जाते. त्यातंर्गत नाशिक जिल्ह्यातील श्री सप्तशृंग देवी गड आणि त्र्यंबकेश्वरच्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठातील प्रसाद प्रमाणित झाला आहे.
अन्न सुरक्षा व मानांकन विभागाच्या माध्यमातून प्रमाणिकरण केले जाते. देशातील ७५ जिल्ह्यांतील ३०० धार्मिक स्थळावर या उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेची हमी देण्यात आली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यांतील या दोन स्थळांचा समावेश आहे.(Bhog Certified Prasad Saptshring Fort Trimbakeshwar hygiene food safety covering 300 places of worship in 75 districts nashik)
राज्यातील दादरचे सिद्धिविनायक मंदिर, इस्कॉन मंदिर, नांदेडचे गुरुद्वारा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर इथे मोठ्या प्रमाणात भाविक प्रसाद घेतात. तिथे या उपक्रमाची अंमलबजावणी यापूर्वी सुरु करण्यात आली. श्री सप्तशृंग देवी गड आणि त्र्यंबकेश्वरच्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथील प्रसादाचे प्रमाणिकरण करण्यात आले आहे, अशी माहिती अन्न सुरक्षा विभागाचे सहआयुक्त गणेश पाळीकर यांनी दिली.
‘इट राईट इंडिया’ उपक्रमाबद्दल
हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे मानांकन केले जाते. कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ असल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाते. त्याधर्तीवर उत्तरेत प्रसादालय ‘भोग'' म्हणून संबोधले जाणाऱ्या धार्मिक संस्थांच्या प्रसादालयात अन्न सुरक्षा व स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी ‘इट राईट इंडिया‘ हा उपक्रम राबवला जातो. प्रसाद, अन्न पदार्थ तयार करताना हाताळणी आणि अन्नपदार्थांच्या वाटपासह विक्रेत्यांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्याचा त्यात समावेश आहे. उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून धार्मिक स्थळांची निवड केली जाते. अशा ठिकाणी अन्न सुरक्षा व मानांकन कायदा २००६ अंतर्गत परवाना देण्यात येतो.
पोट भरणे हे यज्ञकर्म
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
|| जय जय रघुवीर समर्थ ||
समर्थ रामदास स्वामी यांचा हा श्लोक आहे. अर्थात, तोंडात घास घेताना श्री हरीचे फुकटचे नाव घेतल्याने हवन होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न साक्षात परब्रह्म आहे. पोटभरणे म्हणजे जेवण असे नाही, तर तो एक प्रकारचा यज्ञकर्म आहे, असे समर्थांनी या श्लोकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.