esakal | डॉक्टर मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

cidco hospital marhan.jpg

अंबड लिंक रोडवरील खासगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेले नातेवाईक व मित्रमंडळींनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३) रात्री घडला. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त नगरसेवक हेमंत शेट्टी पोलिस ठाण्याजवळ गेले असता, पोलिसांनी शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

डॉक्टर मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : अंबड लिंक रोडवरील खासगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेले नातेवाईक व मित्रमंडळींनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३) रात्री घडला. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे वादग्रस्त नगरसेवक हेमंत शेट्टी पोलिस ठाण्याजवळ गेले असता, पोलिसांनी शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

नगरसेवक शेट्टी यांसह त्यांच्या 15 ते 20 समर्थकांवर गुन्हा दाखल
शहरातील ग्लोबल हस्पिटलमध्ये कोविड सदृष्य आजाराने रुग्ण दगावल्याने नातेवाईक व डॉक्टरांमध्ये उपचाराच्या प्रश्नावर वाद झाला. डॅाक्टरांना मारहाण करण्यात आली. यावेळी याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये ग्लोबल हॉस्पिटलमध्ये झालेल्या वादातून काही नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली.  डॉक्टरांच्या चुकीमुळेच रुग्ण दगावल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला. या घटनेसंदर्भात दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी अंबड पोलीस स्टेशनला धाव घेतली होती. याच विषयाच्या अनुषंगाने नगरसेवक शेट्टी व त्यांचे काही कार्यकर्ते अंबड पोलीस स्टेशनला आले होते. या सर्व प्रकरणात अंबड पोलिसांनी नगरसेवक शेट्टी यांसह त्यांच्या 15 ते 20 समर्थकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. कोरोना आजाराच्या संदर्भात गर्दी जमवल्या प्रकरणी हा गुन्हा दखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन तपास

घटनास्थळ व पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार खासगी रुग्णालयात गेल्या तीन-चार दिवसांपासून एक महिला रुग्ण उपचारासाठी दाखल होती. उपचार सुरू असताना सोमवारी तो दगावला. संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता की निगेटिव्ह या संदर्भात माहिती मिळाली नाही.  31 जुलैला मध्यरात्री पंचवटी येथील एका महिलेला श्र्वसनाचा त्रास झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्या रुग्णाला संशयित  कोरोना रुग्ण म्हणून दाखल करुन उपचार सुरू केले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरचे सर्व अंत्यसंस्कार शासनाच्या नियमाप्रमाणे कोविड रुग्ण म्हणून करण्यात आले. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी सोमवारी डॉक्टरांकडे रुग्णाच्या  विमा पॉलिसी संदर्भातील फाईलची मागणी केली. आमच्या रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. तुम्ही कोविड रुग्ण म्हणून त्यांच्यावर चुकीचे उपचार केले, असा आरोप करीत वाद घातला. त्यातील काही नातेवाईकांनी थेट डॉकटरांना मारहाण केली. त्यानंतर  डॉ. दिनेश पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार केली.  मात्र, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. पोलिसांकडून तपास सुरू होता. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन त्यानुसार पोलिस तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.  

हेही वाचा > विवाहितेचे विचित्र वागणे बेतले तिच्याच जीवावर...दुर्दैवी घटनेने कुटुंबीयही हादरले

हेही वाचा > धक्कादायक! नशेचे रॅकेट आजही कायम...पोलीसांच्या हुक्का पार्लर छाप्यात खळबळजनक गोष्टींचा खुलासा​

संपादन - ज्योती देवरे

loading image