esakal | भाजपच्या हातून स्थायीची सत्ता जाण्याची शक्यता; उच्च न्यायालयात उद्या सुनावणी 
sakal

बोलून बातमी शोधा

nashik nmc bjp.jpg

तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (ता. १३) सुनावणी होणार आहे. विरोधात निर्णय झाल्यास महापालिकेतील स्थायी समितीची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातून जाण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या हातून स्थायीची सत्ता जाण्याची शक्यता; उच्च न्यायालयात उद्या सुनावणी 

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (ता. १३) सुनावणी होणार आहे. विरोधात निर्णय झाल्यास महापालिकेतील स्थायी समितीची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातून जाण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या हातून स्थायीची सत्ता जाण्याची शक्यता 
महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक असले तरी नाशिक रोडच्या पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव व फुलेनगरच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे संख्याबळ घटल्याने भाजपचे तौलनिक संख्याबळ घटले आहे. तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढला असल्याचा दावा असताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी स्थायी समितीवर भाजपच्या आठऐवजी नऊ सदस्यांची नियुक्ती केल्याचा दावा शिवसेनेने केला होता.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

उच्च न्यायालयात उद्या सुनावणी 

महापौरांनी नऊ सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यादरम्यान स्थायी समितीवर भाजपने बहुमताच्या आधारे सत्ता मिळविली होती. फेब्रुवारीत स्थायी समितीच्या आठ निवृत्त जागांवर नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यापूर्वी १३ जानेवारीला शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयात महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, नगरसचिव यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

स्थायीच्या निवडणुकीवर परिणाम 
भाजपचे तौलनिक संख्याबळ घटल्याने त्यानुसार स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचे न्यायालयाने आदेशित केल्यास स्थायी समितीमध्ये १६ पैकी आठ सदस्य भाजपचे होतील. शिवसेनेचे पाच, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य होईल. अशावेळी सर्व विरोधी पक्ष शिवसेनेच्या बाजूने उभे राहिल्यास आठ-आठ सदस्य होतील. चिठ्ठी पद्धतीने सभापतीची निवड केल्यास त्यातून विरोधी पक्षाची चिठ्ठी निघाल्यास भाजपच्या हातून स्थायी समितीची सत्ता जाण्याची शक्यता आहे.