नाशिक : बंडखोरी टाळण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp-flag

नाशिक : बंडखोरी टाळण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन

नाशिक रोड : महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सध्या बंडखोरी होऊ नये म्हणून प्रत्येक पक्ष खबरदारी घेत आहे. सध्या सर्वच पक्ष अलर्ट मोडमध्ये आहेत. भाजपमध्ये बंडखोरी होऊ नये म्हणून नाशिक रोडमध्ये कमालीची काळजी घेतली जात आहे. येथे भाजपचे १२ नगरसेवक आहेत. सध्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप गट व विद्यमान आमदार राहुल ढिकले गट सक्रिय झाला असून पक्षातील आपली हक्काची माणसे नगरसेवक झाली पाहिजे यासाठी दोघेही कामाला लागले आहेत. माजी आमदार बाळासाहेब सानप हे सध्या नाशिक रोड मध्ये विशिष्ट नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या घरी फिरत आहे. पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून काळजी घेत आहे.

नाशिक रोड भाजप मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्यावर पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून जबाबदारी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह भाजप उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, नगरसेवक बाजीराव भागवत, भटक्या विमुक्त जाती उत्तर महाराष्ट्र समन्वयक नवनाथ ढगे, शांताराम घंटे, ज्ञानेश्वर चिडे, अशोक गवळी, विनोद खरोटे, नितीन गवळी, किरण पगारे, विनोद नाझरे, युवा मोर्चा सरचिटणीस ओंकार लभडे, विशाल पगार, करण गायकवाड, अमित शुक्ल, राम डोबे

आदी पदाधिकाऱ्यांनी हेमंत गायकवाड यांच्या घरी भेट दिली. या भेटीत जुने नवे पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन सोहळा पार पडला. जुने वाद संपुष्टात येऊन पुन्हा पक्षवाढीसाठी प्रयत्न करा असा सूर सगळ्यांनीच काढला. संगीता गायकवाड व बाजीराव भागवत यांच्या व्यतिरिक्त या बैठकीला इतर कोणतेही नगरसेवक बोलविण्यात आले नव्हते. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा: फास्टटॅगधारकांना नवा झटका; चांदवडनंतर धुळ्यालाही कापला जातो टोल

सानप ढिकले येणार आमने-सामने

येथे ‘बीएसपी’ या सांकेतिक भाषेत रूढ असणारा गट सक्रिय आहे. बीएसपी म्हणजेच बाळासाहेब सानप गटाचे सध्या डॉ. सीमा ताजणे , सुमन सातभाई, विशाल संगमनेरे हे नगरसेवक आहेत. विशाल संगमनेरे हे नुकतेच संजय राऊत यांना भेटून आले असल्यामुळे पक्षांतराची चर्चा नाशिक रोडमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. बाळासाहेब सानप नाशिक रोडमध्ये सध्या आपल्या हक्काच्या माणसांची मोर्चेबांधणी करीत आहे. आमदार राहुल ढिकले सध्या आपल्या हितचिंतक कार्यकर्त्यांच्या पंखांना नगरसेवक होण्यासाठी बळ देत आहेत. येणाऱ्या काळात सानप ढिकले गट आमने-सामने पाहायला मिळत आहे

हेही वाचा: नाशिक : आयटी पार्क प्रस्तावाला अखेर मंजुरी

loading image
go to top