esakal | ''भाजपने लॉलीपॉप देणे थांबवावे!'' छगन भुजबळ यांचा उपरोधिक टोला
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal changan.jpg

ते म्हणाले, की आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश करण्याकडे अनेकांचा कल होता. आता उलट होत असून, खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने भाजपने आता खडसे यांची काळजी करू नये.

''भाजपने लॉलीपॉप देणे थांबवावे!'' छगन भुजबळ यांचा उपरोधिक टोला

sakal_logo
By
विक्रांत मते


नाशिक : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अजून काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून, ते लवकरच भाजपला रामराम ठोकणार आहेत. आता आम्ही फक्त बॉक्स उघडला आहे. त्यामुळे आमदारांना भाजपने लॉलीपॉप देणे थांबवावे, असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता.२४) येथे लगावला. 

खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मान

एकनाथ खडसे यांनी भाजपचे बारा ते पंधरा आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर छगन भुजबळ यांनीही स्वतंत्ररीत्या माध्यमांशी संवाद साधताना आम्ही फक्त बॉक्स उघडल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश करण्याकडे अनेकांचा कल होता. आता उलट होत असून, खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने भाजपने आता खडसे यांची काळजी करू नये. सातत्याने अपमान होत असल्याने निराश झालेल्या खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मान होईल. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

योग्य वेळ आल्यावर पक्षाचे नेते शरद पवार त्यांना न्याय देतील. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर विरोधकांकडून टीका होत आहे. परंतु केंद्र सरकारकडे ‘जीएसटी’चे थकीत व शेतकरी म्हणून आर्थिक मदत मिळाली असती, तर शेतकऱ्यांना अधिक मदत करता आली असती, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.  

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

loading image
go to top