खळबळजनक! कोविड रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या 'त्या' इंजेक्शनचा चक्क काळाबाजार...नेमका काय प्रकार?

injection.jpg
injection.jpg

नाशिक : संधिवाताच्या रुग्णांसाठी प्रामुख्याने वापरले जाणारे "टोसिलिझुमॅब' या मॉलिक्‍युलचा वापर राज्यात नव्हे तर परदेशातही कोविड रुग्णांसाठी केला जात आहे. अचानक उत्पादनाला मागणी वाढल्याने या उत्पादनाचा औषधी बाजारात काळा बाजार सुरू झाला आहे. नेमकं काय घडतयं?

त्या इंजेक्शनचा वापर राज्यात नव्हे तर परदेशातही

टोसिलिझुमॅब हे द्राव्य वा औषध प्रामुख्याने मुनष्याच्या शरीरातील प्रतिकारशक्तीवर कार्य करते. हे औषध प्रतिजैविक आहे. विज्ञानात यास ह्युमनाइज्ड मोनोक्‍लोनल अँटिबॉडी असे संबोधले जाते. कोविड रुग्णात इंटरल्युकिन 6 (आय एल 6) म्हणजे पांढऱ्या पेशी द्राव तयार करतात. या द्रावाने फुफ्फस ओले होते व रुग्णाला श्‍वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो. त्याला तातडीने कृत्रिम श्‍वासोच्छ्वास लावण्याची गरज भासते. पांढऱ्या पेशी द्राव करण्याच्या प्रक्रियाची रक्त चाचणीतून निष्पन्न होते. ही रक्त चाचणी महागडी असल्याने व रुग्णाची मानसिकता लक्षात घेता डॉक्‍टर रुग्ण पाहून चाचणी सुचवितात. मात्र, सध्या कोविड रुग्णांमध्ये ही चाचणी करणे डॉक्‍टरांना उपचारासाठी क्रमप्राप्त झाले आहे. दरम्यान, यूकेमध्ये काही डॉक्‍टरांनी "टोसिलिझुमॅब' या मॉलिक्‍युलचा वापर कोविड रुग्णांसाठी केला. त्यात त्यांना रुग्ण वाचत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या संदर्भात मुंबईतील काही डॉक्‍टरांना सांगितले. मुंबईत त्याचा प्रयोग झाल्यानंतर "टोसिलिझुमॅब' या मॉलिक्‍युलची व्याप्ती राज्यभर पसरली. त्यामुळे या उत्पादनाला मागणीही वाढली आहे. 

क्‍लिनिकल ट्रायल घेण्यास परवानगी

40 हजार 500 रुपये किंमत असलेल्या हे इंजेक्‍टेबल उत्पादन 60 ते 70 हजार रुपयांना रुग्णाचा हातात पडत आहे. काही विक्रेत्यांनी उत्पादनाचा काळा बाजार रोखण्यासाठी डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन व आधारकार्ड मागवून ते देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशन (सीडीसीओ)ने भारतात विविध ठिकाणी टोसिलिझुमॅबच्या क्‍लिनिकल ट्रायल घेण्यास परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. 

कोविड रुग्णाचा त्रास कमी
रुग्ण बरा होणे हेच आमचे ध्येय असल्याने रक्त चाचणी, रुग्णाची स्थिती व वजन या बाबी तपासूनच "टोसिलिझुमॅब' मॉलिक्‍युल असलेले इंजेक्‍शनचा आम्ही वापर करतो. यात श्‍वासोच्छ्वासचा त्रास होणारा कोविड रुग्ण काही कालावधीतच स्वतः श्‍वासोच्छ्वास घेत असल्याचे दिसून आले आहे.- डॉ. मोहित चौधरी, फिजिशिअन, पायोनिअर हॉस्पिटल, नाशिक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com