वाडीव-हे (नाशिक) : रायगडनगर नगर जवळील वालदेवी धरणावर वाढदिवस साजरा करणेसाठी गेलेल्या 9 तरूणा पैकी सहा जण पाण्यात बुडाले. शोधकार्य त्वरित चालु केले. एक मुलीचा मृतदेह काल मिळाला. रात्री शोधकार्य थांबले आज सकाळी 9 वाजता ऊर्वरीत मृतदेह मिळाले. त्यापैकी 3 तरूण वाचले आहे.
वाढदिवस साजरा करणे भोवले
सोनी गमे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिहस्थ नगर, मोरवाडी, सिडको पाथर्डी फाटा परिसरातील 9 तरूण तरूणी वालदेवी. धरणावर आले होते. काही तरूण उत्साहाच्या भरात धरणाच्या जवळ फोटो काढण्यासाठी गेले असता, काही तरूण पाय घसरून पाण्यात पडले त्यांना वाचविण्यासाठी इतरांनी पाण्यात उड्या मारल्या. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज महीती नसल्याने,व पोहता येत नसल्याने हिंमत चौधरी ( वय 16 ) आरती भालेराव, नाजीया वजीर मनीयार ( वय 19 ) खुषी वजीर मनीयार ( वय 10 ) जोती गमे ( वय 16 ) सोनी गमे हे पाण्यात बुडाले. समाधान वागळे, प्रदिप जाधव, सना वजीर मनियार हे सुदैवाने वाचले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.