चंदेरी दुनियेलाही 'इथली' भुरळ! आगामी काळात होणार प्रत्यक्ष चित्रीकरण..

CHD20A00475_th.jpg
CHD20A00475_th.jpg

अहो आश्‍चर्यम! चंदेरी दुनियेलाही गोदाकाठाची भुरळ 

नाशिक / चांदोरी :
मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण रद्द झाल्याने निर्मात्यांनी सांगली, सातारा परिसरात चित्रिकरणास प्राधान्य दिले खरे पण तेथेही अडचणी निर्माण झाल्याने निर्मात्यांना आता नाशिकचा पर्याय सोयीस्कर वाटत आहे. त्यातही निसर्गसौंदर्याने भरभरून असलेला गोदाकाठ चंदेरी दुनियेतील लोकांना चित्रीकरणासाठी खुणावत आहे.

गोदाकाठावरची वैशिष्ट्ये 
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोदाकाठावर करंजगाव येथे पेशवेकालीन गढी, पुरातन सिद्धेश्वर मंदिर, गोदाघाट, नांदूर मध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्य, धरण, इंग्रजांनी बांधकाम केलेले तसेच अनेक वड वृक्षांच्या सानिध्यात असलेले नाविन्यपूर्ण विश्राम गृह, चांदोरी येथील गोदावरी नदी व पुरातन मंदिरे, जुनी घरं, वाडे, गोदा पात्रात अजूनही होत असलेला नावेचा प्रवास, चांदोरीमधील तीन मजली बुद्धविहार हे लाकडात नक्षीकाम असलेली चावडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. दारणा सांगवी येथील दारणा गोदेचा संगम, संगमावर असलेले मंदिर, तसेच बारमाही वाहणारी गोदावरी नदी, कोठुरे येथे पुरातन बानेश्वर महादेव मंदिर असून चिंचेचे व वडाची झाडे आहेत. राम वमन मार्ग असून पेशवेकालीन वाडे व घरांचे बांधकाम आहे. यामुळे संपूर्ण गोदाकाठ खुणावत आहे. 


चित्रीकरणाचा इतिहास 
गोदाकाठ व परिसरात नेहमीच ऊस, द्राक्ष यांसह इतरही पिकांचे उत्पादन घेतले जात असताना नेहमीच हिरवागार दिसतो. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी कालिया मर्दन हा मुकचित्रपट सन 1919 मध्ये म्हणजेच 100 वर्षांपुर्वी बनवलेला, त्याचे चित्रीकरण चांदोरी व सायखेडा आदी गावांत झाले, तसेच राजदत्त निर्मित वि. दा. सावरकर मालिकेचे चित्रीकरणही चांदोरी गावात झाले. 


स्थानिक व्यवसायांना चालना 
चित्रीकरणसाठी केली जाणारी गोदाकाठची निवड स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठीही उपयुक्त ठरणार असून दरम्यानच्या कालावधीत राहण्याची व्यवस्था, वाहतूक, जेवण याचबरोबर स्थानिक कलाकारांना यामुळे रोजगार मिळाल्याने स्थानिक विकासाला चालना मिळू शकते. 


लवकरच चित्रीकरणाचा प्रयत्न 
सोशल मीडियावर फिरत असलेल्या चांदोरी येथील नदीच्या फोटोमुळे चित्रीकरण करण्याच्या दृष्टीने भेट दिली असता गोदावरीचे वेगळेच रूप पाहवयास मिळाले, यापूर्वी नासिक येथील गोदाघाटावर पीके, बुलेटराजा अशा चित्रपटांचे चित्रीकरण केले. चांदोरी येथील गोदाघाट पण असाच सुंदर आणि रमणीय आहे. त्यामुळे तेथेही लवकरच चित्रीकरण करण्याचा प्रयत्न आहे. -अमित कुलकर्णी, एकदंत फिल्म, नाशिक 

हेही वाचा > भुजबळ संतापले...अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नेमके काय घडले?
पर्यटनास चालना शक्‍य 
नाशिक शहरासह ग्रामीण भागात चित्रीकरण होण्याची शक्‍यता असल्याने ग्रामीण भागासह शहरातील कलाकार, तंत्रज्ञांना संधी मिळून ग्रामीण भागातील पर्यटनास चालना मिळेल. -सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य चांदोरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com