#COVID19 : इतिहासात पहिल्यांदाच नोटप्रेस बंद ठेवण्याची वेळ ! 

note press.jpg
note press.jpg
Updated on

नाशिक :  : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रविवारी (ता. 22) देशात जनता संचारबंदी लावण्यात आली होती. सर्वत्र त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या पार्श्‍वभूमीवर इंडिया सिक्‍युरिटी प्रेस मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांची मुद्रणालयांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात 31 मार्चपर्यंत दोन्ही मुद्रणालये बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याची महिती मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे यांनी दिली. त्यामुळे मुद्रणालयातील छपाई व प्रशासकीय कामकाज बंद राहणार आहे. अत्यावश्‍यक सेवा सुरू राहील. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना

नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयात दोन्ही पाळ्यांमध्ये १९०० कामगार काम करतात. तर जेलरोड येथील चलार्थ पत्र मुद्रणालयात दोन्ही पाळ्यांमध्ये २१०० कामगार काम करतात.सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या कारणास्तव मजदूर संघाने व्यवस्थापनाकडे दोन्ही मुद्रणालये बंद ठेवण्याची मागणी केली होती. मुद्रणालय व्यवस्थापनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मुद्रणालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी सांगितले. मुद्रणालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेस बंद ठेवण्याची वेळ आली आहे."

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली आहे.कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेऊन केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनादेखील दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, संपूर्ण राज्यामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Revises TET CTET Teacher Promotion Rules
Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
Marathi News Esakal
www.esakal.com