Accident
Accidentesakal

Nashik Accident News : ट्रॅक्टरच्या धडकेत चिमुकला ठार

एकलहरे येथील वीटभट्टीवर उभा असलेल्या टॅक्टरला लावलेली चावी फिरविल्याने तो चालू झाला आणि ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एक वर्षाचा चिमुकला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Nashik Accident News : एकलहरे येथील वीटभट्टीवर उभा असलेल्या टॅक्टरला लावलेली चावी फिरविल्याने तो चालू झाला आणि ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एक वर्षाचा चिमुकला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. (boy was dead in collision with tractor nashik accident news)

अनिकेत लवकुश गौतम (१, रा. सरदुसे यांची वीटभट्टी, एकलहरे) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. पोलीस अंमलदार एन.पी. गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, सदरील घटना शनिवारी (ता. ३०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

अनिकेत हा खेळत होता. त्याचवेळी ट्रॅक्टर उभा होता. त्यास चावीही लावलेली होती. काही मुलांनी ती चावी फिरविल्याने ट्रॅक्टर चालू झाला आणि ट्रॅक्टरची धडक अनिकेतला बसल्याने तो गंभीररित्या जखमी झाला.

Accident
Nashik Accident News: ओझर येथे कारची ज्युपिटरला धडक; एकाचा मृत्यू

त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकयी अधिकार्यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Accident
Nashik Accident News: दोन दुचाकींच्या अपघातात 3 जखमी, एक गंभीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com